shah-pawar.jpg 
मुंबई

'अहो जाऊन विचारा की पवार आणि पटेलांना'

दीनानाथ परब

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात अहमदाबादमध्ये भेट झाल्याच्या एका बातमीने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे, तरीही विरोधक यावरुन सत्ताधाऱ्यांना चिमटा काढण्याची एकही संधी सोडत नाहीयत. 

शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या विषयावर एक टि्वट केले आहे. "काही गोष्टी वेळेबरोबर स्पष्ट झाल्या पाहिजेत. अन्यथा संभ्रम निर्माण होतो. मी ठाम विश्वासाने सांगतो की, शरद पवार आणि अमित शाह यांच्या अहमदाबादमध्ये कुठलीही गुप्त बैठक झालेली नाही. आता तरी या अफवा संपवा, काहीही हाताला लागणार नाही" असे राऊत यांनी म्हटले आहे. 

संजय राऊत यांच्या या टि्वटवर अतुल भातखळकर यांनी एक खोचक शब्दात टीका करणारे एक टि्वट केले आहे. अतुल भातखळकर हे कांदिवलीतील भाजपाचे आमदार आहेत. 

काय होती ती बातमी 
काल एका वर्तमानपत्राने अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवारांची भेट झाल्याचे वृत्त दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही सोबत असल्याचा दावा करण्यात आला. 

अमित शाह यांना, जेव्हा या भेटीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी 'अशा गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात' असे, उत्तर देऊन एक प्रकारे या चर्चेला हवाच दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अशी कुठलीही भेट झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. या कथित भेटीच्या बातमीवरुन मात्र राज्याच्या राजकारणात विविध तर्क-विर्तकांना ऊत आला आहे. विविध अंदाज वर्तवले जात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT