Nitesh Rane  sakal
मुंबई

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांना माझगाव न्यायालयाकडून चक्क १०० रुपये दंड ! ते वक्तव्य भोवले.. काय घडलं नेमकं ?

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अखेर काल (ता.२६) माझगाव न्यायालयात हजर झाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अखेर काल (ता.२६) माझगाव न्यायालयात हजर झाले. अजामीनपात्र वॉरंट प्रकरणी अटक टळली असली तरी न्यायालयाने त्यांना १०० रुपायांचा दंड ठोठावत पुढील सुनावणीला हजर राहण्यास बजावले आहे.

आमदार नितेश राणे यांनी बदनामीकारक वक्तव्य केल्या प्रकरणी खासदार राऊत यांनी त्यांच्या विरुद्ध अब्रुनुकसानीच्या खटला दाखल केला आहे. त्या खटल्यात वारंवार समन्स बजावल्यानंतरही नितेश राणे न्यायालयात गैरहजर राहिल्याने दंडाधिकार्‍यांनी ३० जानेवारी रोजी नितेश राणें विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणेंनी वॉरंट रद्द करण्याची मागणी करत सत्र न्यायालय व त्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांची विनंती अमान्य करत २६ फेब्रुवारी रोजी माझगाव न्यायालयात हजर राहावेच लागेल, असे निर्देश दिले होते त्यानुसार आज दंडाधिकारी न्यायालयात नितेश राणे हजर होते. महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांच्यासमोर राणे उपस्थित राहिल्यानंतर न्यायालयाने त्यांना १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला तसेच अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT