Nitesh Rane esakal
मुंबई

Mumbai News : भाजप आमदार नितेश राणेंविरोधात दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी चौकशीची मागणी; सर न्यायाधीशांना लिहिले पत्र

गोवंडी येथे जनआक्रोश मोर्चा दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गोवंडी येथे जनआक्रोश मोर्चा दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. नितेश राणेंच्या वक्तव्या प्रकरणी मुंबईतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सर न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. राणेंच्या द्वेश युक्त भाषणाची सर्वोच्च न्यायालयाने सुओमोटो दखल घ्यावी तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गोवंडी येथे काही दिवसांपूर्वी जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजबाबत द्वेषयुक्त भाषण केले होते. मुस्लिमांची घरे, दुकाने आणि मशिदी पालिकेने जमीनदोस्त कराव्यात तसेच मुस्लिम हे हिरवे साप असल्याचे त्यांनी म्हटले होते. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या राणे यांच्या प्रक्षोभक भाषणानंतर पोलिसांनी सुद्धा कोणतीही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.

आमदार राणे यांच्या भाषणामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून सर्वोच्च न्यायालयाने याची स्वतः हुन दखल घ्यावी म्हणुन गोवंडीतील वकिलांनी व विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशाना पत्र लिहिले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच या पत्राकडे न्यायालयाने याचिकेच्या स्वरूपात पाहावे असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT