Mumbai Crime bjp INC  Sakal
मुंबई

Mumbai Fraud : भाजप पदाधिकाऱ्याचा कॉंग्रेस पदाधिकाऱ्याला 2 लाखाचा चुना

ते धनादेश बॅंकेत जमा केले असता दोन्ही धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर वर्ष उलटूनही संतोष पैसे दिले नाहीत.

शर्मिला वाळुंज

Mumbai Crime - आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवित भाजप पदाधिकाऱ्याने काँग्रेस पदाधिकाऱ्याला 2 लाखांचा चुना लावल्याची घटना मुरबाड तालुक्यात घडली आहे.

याप्रकरणी कॉंग्रेसचे पदाधिकारी मधुकर देसले (वय 56) यांनी टोकावडे ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष पवार व जगदीश वाळिंब यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. संतोष हा ठाणे जिल्हा भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी आहे. तर त्याचा साथीदार जगदीश हा आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत ते नागरिकांची लुबाडणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

मुरबाड तालुक्यातील टोकावडे परिसरात मधुकर देसले हे राहण्यास आहे. संतोष पवार याचे मुरबाड तहसील कार्यालयासमोर झेरॉक्सचे दुकान आहे. या दुकानात संतोष आणि मधुकर यांची 2021 साली ओळख झाली होती.

25 ऑगस्टला पुन्हा दोघांची दुकानात भेट झाली. संतोष याने मधुकर यांच्याकडे पत्नीचे गहाण ठेवलेले दागिने सोडविण्यासाठी पाच दिवसांसाठी दोन लाख रुपये देण्याची मागणी केली होती. दोघांची ओळख असल्याने संतोषवर विश्वास ठेवत मधुकर यांनी संतोषला दोन लाख रुपये दिले.

दरम्यान संतोषने मधुकर यांना आरोग्य विभागात नोकरीसाठी जाहीरात निघाली आहे. तुमच्या नातेवाईकांना नोकरी लावायची असेल तर सांगा, माझा नातेवाईक मोठा अधिकारी आहे. आयपीएस अधिकारी असून तो नोकरी लावून देण्याचे काम करेल असे सांगितले. या आमिषाला बळी पडत देसले यांनी भाचा गणेश घोलप याने आरोग्य विभागात वाहन चालक म्हणून अर्ज भरला आहे. त्याचे नोकरीचे काम होईल का ? असे संतोषला विचारले. त्यावर संतोषने त्यांना काम होईल असे सांगितले होते.

त्यानंतर 26 ऑगस्टला मुंबईतील ताज हॉटेलच्या लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये संतोषने तोतया आयपीएस अधिकारी जगदीश याच्याशी मधुकर यांची भेट घालून दिली. हॉटेलमध्ये बैठकीमध्ये भाचा गणेशचे नोकरीचे काम करण्यासाठी 10 लाख रुपये द्यावे लागतील असे मधुकर यांना सांगण्यात आले. अॅडव्हान्स 3 लाखाची रक्कम द्यावी लागेल असे जगदीशने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत मधुकर यांनी 1 लाख रुपये संतोष व जगदीश यांना दिले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

2 सप्टेंबर नंतर गणेश याच्या नोकरीचे काम कधी होणार असे मधुकर हे संतोषला विचारत असत. त्यावर आरोग्य विभागाची भरती परीक्षा रद्द झाली असे संतोषने सांगितल्याने मधुकर यांनी संतोषकडे दिलेली रक्कम परत करण्याचा तगादा लावला होता. संतोष याने मधुकर यांना काही धनादेश दिले होते. ते धनादेश बॅंकेत जमा केले असता दोन्ही धनादेश बाऊन्स झाले. त्यानंतर वर्ष उलटूनही संतोष पैसे दिले नाहीत.

मध्यंतरी संतोषने 50 हजार दिले. उर्वरीत रक्कम देण्यास संतोष टाळाटाळ करत असल्याने तसेच मधुकर यांना मारण्याची धमकी देत असे. माझा नातेवाईक आयपीएस अधिकारी आहे, मला पोलिस घाबरतात अशी बतावणी देखील केली.

अखेर 7 जुलैला मधुकर यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात धाव घेत संतोष व जगदीश याच्या विरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिस पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT