Shradh of Diva Lake in Pitru fortnight sakal
मुंबई

Diva News : पितृ पंधरवड्यातच भाजपने घातले दिवा तलावाचे श्राद्ध

दिवा शहरात एकूण चार तलाव आहेत. त्यातील दिवा पूर्वेकडील स्टेशन परिसरात असणाऱ्या या तलावाची वाईट दुरावस्था झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

दिवा - दिवा स्टेशनच्या बाजूला असणाऱ्या तलावाच्या दुरवस्थेबाबत भारतीय जनता पार्टीने महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या तलावाच्या दुरवस्थेचा निषेध करताना तलावाचे श्राद्ध घालून अनोखे आंदोलन केले.

दिवा शहरात एकूण चार तलाव आहेत. त्यातील दिवा पूर्वेकडील स्टेशन परिसरात असणाऱ्या या तलावाची वाईट दुरावस्था झाली असून तलावाच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठे? असा सवाल भाजपने या आंदोलन दरम्यान विचारला आहे. हा तलाव दिवा शहरातील मोक्याच्या ठिकाणी आहे.

या तलावाच्या चहूबाजूने अतिक्रमण झालेले असून त्यात मच्छी मार्केटची घाण, बाजूच्या इमारतींचे सांडपाणी, तेथे व्यवसाय करणाऱ्या वडापाव वाल्यांची घाण यात सोडल्याने त्यातील जीवंत असणारे मासे, किडे, पक्षी यांना धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी आजचे भाजपा मार्फत केले गेलेल्या आंदोलनाचे जनमाणसातून कौतूक केले जात आहे.

यावेळी भाजपचे मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा सचिव विजय भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारी सदस्य विनोद भगत, अशोक पाटील, रेशमा पवार, ठाणे युवा मोर्चा उपाध्यक्ष सतीश केळशीकर, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, समीर चव्हाण, ओबीसी मोर्चा दिवा मंडळ अध्यक्ष रोशन भगत, महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील, सपना भगत, जयदिप भोईर, जिलाजीत तिवारी, गौरीशकर पटवा, समशेर यादव, अमरनाथ गुप्ता, सुशील सिंग, विरेंद्र गुप्ता आशिष पाटील प्रणय भोईर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT