MLA Prasad Lad sakal media
मुंबई

पावसाळी अपघातांचे झोपड्यांमधील बळी हे शिवसेनेचे पाप, प्रसाद लाडांचा घणाघात

नागरिकांनी शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत कठोर शिक्षा द्यावी, प्रसाद लाडांचे आवाहन

कृष्णा जोशी

मुंबई : शहरातील डोंगरांवर, खाजण जमिनीत झोपडपट्ट्या (Slum) फोफावण्यास, गेली पंचवीस वर्षे महापालिकेत (BMC) सत्ता असलेली शिवसेनाच जबाबदार आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात (Monsoon) अपघातांमुळे झोपड्यांमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचे(Shivsena) पाप असून याबद्दल नागरिकांनी शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत (BMC Election) कठोर शिक्षा द्यावी, असे आवाहन भाजपचे राज्य उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे . (BJP Prasad Lad criticizes Shivsena Over Monsoon rainfall tragedy of slum area-nss91)

काल मुंबईत तुफानी पावसाने झोपड्यांवर दरडी आणि संरक्षक भिंती कोसळून 31 जण मृत्युमुखी पडले. त्या पार्श्वभूमीवर लाड यांनी वरील टीका केली आहे. शहरात झोपड्यांची वाढ न होण्याची आणि त्या रहिवाशांसाठी शहरात सन्मानाने जगण्याची व्यवस्था करणे हे शिवसेनेचे कर्तव्य होते. मात्र मतांसाठी त्यांनी ते पार पाडले नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात झोपड्यांची वाढ थांबवणे हे तर शिवसेनेच्याच हातात होते. तसेच झोपड्यांमधील नागरिकांना सन्मानाने जगता यावे यासाठी सरकारवर दडपण आणण्याचे प्रयत्न शिवसेना करू शकली असती. मात्र वाटेल तेथे अनिर्बंध झोपड्या उभारल्या जात असताना मतांसाठी शिवसेनेने त्याकडे काणाडोळा केला. शहरावर पंचवीस वर्षे शिवसेनेची सत्ता आहे, या सर्व काळात जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी त्यांचेच होते. याच काळात मुंबईत वेगाने झोपड्या फोफावत गेल्या, त्याला कोणा लोकप्रतिनिधींचा `अर्थ`पूर्ण पाठिंबा होता हे उघड गुपित आहे, असेही लाड म्हणाले.

दर पावसाळ्यात तुंबणारी मुंबई तसेच रस्त्यांवर पडणारे खड्डे याने मुंबईकर संत्रस्त झाले आहेत. शहरातील यासंबंधीची कामे करणारे कंत्राटदार व शिवसेनेचे कारभारी यांची मिलीभगतही सर्वांनाच ठाऊक आहे. याच हितसंबंधातून कारभाऱ्यांना मलई मिळते व नागरिकांच्या नशिबी खड्डे पडलेले रस्ते आणि तुंबलेली मुंबई येते. यातून नागरिकांच्या रागाचा स्फोट आपल्यावर होऊ नये म्हणून मधेच कधीतरी कंत्राटदाराच्या वृद्ध, गरीब कर्मचाऱ्याला थोबाडीत मार, त्याला कचऱ्याने अंघोळ घाल असे प्रकार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करतात. वास्तविक हे कंत्राटदार हे शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे मित्रच असतात. या कंत्राटदाराला हात लावण्याची त्यांची हिंमत नसते, म्हणून कंत्राटदाराच्या गरीब कर्मचाऱ्यांसमोर अशी नाटके केली जातात, अशीही टीका लाड यांनी केली आहे. या सर्व नाटकांचा पर्दाफाश मतदारांनी येत्या निवडणुकीत करावा, असेही लाड यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT