bjp pravin darekar over eknath khadse statement of devendra fadnavis politics  Sakal
मुंबई

Mumbai News : एकनाथ खडसे राजकारणातील नासका कांदा; भाजप गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा आहेत. तर एकनाथ खडसे हे राजकारणातील नासका कांदा आहेत. ते भविष्यातील राजकारणात कितपत तग धरतील याची शंका असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा आहेत. तर एकनाथ खडसे हे राजकारणातील नासका कांदा आहेत. ते भविष्यातील राजकारणात कितपत तग धरतील याची शंका असल्याचे प्रत्युत्तर भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.

एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेसंदर्भात दरेकर बोलत होते. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात मत्सराने बोलण्यापलीकडे ते दुसरे काहीच करू शकत नाहीत, असेही दरेकर म्हणाले.

आज भाजप लोकसभा निवडणुकीत ४०० चा आकडा पार करण्याच्या स्थितीत आहे. केजरीवाल, ममता बॅनर्जी स्वतंत्रपणे लढत आहेत. नितीश कुमार जो खऱ्या अर्थाने एनडीएचा चेहरा बनू शकले असते त्यांनी भाजपासोबत युती केली आहे.

त्यामुळे इंडिया आघाडीची पूर्णपणे त्रेधातिरपीट उडाली आहे. महाराष्ट्रात संजय राऊत यांनी उरले सुरले अस्तित्व वाचवण्याचा प्रयत्न करावा. संजय राऊत बोलघेवडे आहेत. बोलण्यापलीकडे त्यांची कृती शून्य आहे. त्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. आधी स्वतःचे अस्तित्व शोधा मग रामावर बोला असा टोलाही दरेकरांनी राऊत यांना लगावला.

इंडिया आघाडी प्रकाश आंबेडकर यांना किंमत देत नाही, त्यामुळे ते चिडून आहेत. प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने बोलवून चर्चा करणे अपेक्षित असताना त्यांना कस्पटासमान लेखले जात आहे. देशपातळीवर काय चालले आहे हे आंबेडकरांनाही दिसते आहे.

त्यामुळे देशपातळीवर इंडिया आघाडीची जी अवस्था झाली आहे, तशीच महाराष्ट्रातही होणार आहे. कितीही कडबोळी बांधली तरी देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे नेतृत्व देण्याचा विचार नक्की केल्याचे देशभर दिसते आहे, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठा अनर्थ टळला... जुई गडकरीच्या विमानात बिघाड? कॅप्टनने वाचवलं, अभिनेत्रीच्या पोस्टने चाहते चिंतेत

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला भावाने बहिणीकडे जावे की बहिणीने भावाकडे? जाणून घ्या धार्मिक मान्यता अन् पौराणिक कथा

Hajgoli MD Drugs Case: हाजगोळी ड्रग्जप्रकरणात सहा संशयितांना अटक; मुंबई, बेळगावातून अर्थपुरवठा; मुंबईच्या चौघांचा सहभाग; तपास गतीने

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asian Games 2026: टीम इंडियाच्या पुरुष-महिला संघांचे सामने कधी, कुणाविरुद्ध? तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT