Chhatrapati shivaji maharaj weapon waghnakh sakal
मुंबई

Mumbai News : वाघनखांवरुन शंका घेणाऱ्यांना प्रत्युत्तरासाठी मुंबईत भाजपाचा कार्यक्रम

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात आणण्यासाठी करार झाल्यानंतर त्यावरुन भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा दुसरा अंक रंगणार असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख महाराष्ट्रात आणण्यासाठी करार झाल्यानंतर त्यावरुन भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा दुसरा अंक रंगणार असल्याचे चित्र आहे. या वाघ नखांच्याबाबत शंका घेणाऱ्यांना प्रत्युत्तर म्हणून मुंबई भाजपाने गुरुवारी (ता.१२) दादरच्या स्वातत्रविर सावरकर सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही माहिती दिली.

शंकेखोरांचा कोथळा बाहेर काढणारच - वाघ नखांच्या निमित्ताने' असे या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिनेते डॉ. राहुल सोलापूरकर यांचे व्याख्यान तर शाहीर नंदेश उमप यांचा पोवाडा सादर होणार आहे.

लंडनमधील संग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आणण्याचा करार महाराष्ट्र सरकारने केला. नोव्हेंबरमध्ये तीन वर्षासाठी वाघनखे येणार आहेत. मुंबईसह राज्यातील अन्य भागांमध्ये ही वाघनखे जनतेसाठी खुली असतील.

आदित्य ठाकरे यांनी यावर शंका व्यक्त केली आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी हा कार्यक्रम असल्याचे शेलार यांनी म्हटले. ज्यांच्या मनात शंकेची कीड वळवळत आहे त्यांनी आपल्या बुद्धीत भर घालण्यासाठी कार्यक्रमाला यावे, असे आवाहन देखील शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना केले आहे.

मतांसाठी हे लांगूलचालन सुरू आहे. त्यामुळे अफजलखानाचा कोथळा काढण्यासाठी वापरलेली वाघनखे नको, ती वाघनखे खरी आहेत का? अशी शंका विशिष्ट वर्गाला बरं वाटण्यासाठी उपस्थित केली जाते.

- आशिष शेलार, अध्यक्ष, मुंबई भाजपा

हल्ली भाजपला सगळीकडे उद्धव आणि आदित्य ठाकरेचं दिसतात. ज्या पध्दतीने महाराष्ट्राच्या जनतेकडून या दोघांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे कुठलाही विषय आला की भाजप त्यात उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांना ओढतात. त्यातून आपल्या प्रसिध्दीची हौस भागवून घेतात.

- हर्षल प्रधान, जनसंपर्क प्रमुख, शिवसेना (ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT