मुंबई

लस पुरवठा वाढवण्यासाठी केंद्राला साकडं घालण्याची राज्यपालांकडे विनंती

विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्र सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून आणि लॉकडाउनवरून राजकारण रंगल्याचं दिसतंय. केंद्र सरकारमुळे राज्यात कोरोना लसीची कमतरता असल्याचा आरोप केला जातो आहे. या संदर्भात शुक्रवारी संध्याकाळी भाजपच्या शिष्टमंडळांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, आमदार अतुल भातखळकर, प्रसाद लाड, नितेश राणे, पराग आळवणी हे नेते शिष्टमंडळात होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी भाजपच्या शिष्टमंडळाने लॉकडाउन आणि लस पुरवठा या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

"आज राज्यपालांशी पहिली चर्चा ही लॅाकडाऊनच्या प्रश्नावर झाली. व्यापारी वर्गाचे सध्या आर्थिकदृष्टया कंबरडं मोडलं आहे. त्यांना तुम्ही काय सहकार्य करणार आहात? असा आमचा राज्य सरकारसाठी प्रश्न आहे. इतर राज्यांनी कोरोना काळात विविध पॅकेज दिली आहेत, तशीच आर्थिक पॅकेजेस महाराष्ट्र सरकारने द्यावीत. सरकारने आर्थिक पॅकेज दिलं तर पक्ष नक्कीच सकारात्मक विचार करेल, अशी चर्चा करण्यात आली. त्याचसोबत दुसरा विषय म्हणजे आम्ही लस तुटवड्यासंदर्भात चर्चा केली. राज्यात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या आहेत. पण तरीही अधिक लसींची गरज आहे. त्यामुळे राज्यपालांनी मध्यस्थी करून केंद्राशी चर्चा करावी आणि लस पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत", अशी विनंती भाजपच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आल्याचे दरेकरांनी स्पष्ट केलं.

मी थांबवली लॉकडाउनची चर्चा...

"MPSCच्या विद्यार्थ्यांबद्दलची काळजी पाहता मुख्यमंत्र्यांकडून व्हिडीओ संवादाचे निमंत्रण आले होते. ते निमंत्रण स्वीकारून राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांसोबत मीदेखील संवादात सहभागी झालो होतो. MPSCची चर्चा झाल्यानंतर अचानक लॉकडाउनवर चर्चा सुरू झाली आणि कडक लॉकडाउन कराच असा सूर सरकारच्या मंत्र्यांचा दिसून आला. ते निर्णयापर्यंत पोहोचणार होते पण मी लॉकडाउनची चर्चा थांबवली. आजच्या संवादात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाहीत. त्यामुळे ही चर्चा आता केली जाऊ नये असं मी स्पष्ट सांगितलं. त्यानंतर ही चर्चा उद्या केली जाईल असा निर्णय घेण्यात आला", अशी माहितीदेखील प्रवीण दरेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT