Uddhav Thackeray Sakal
मुंबई

Uddhav Thackeray : भाजपने देशातील हिंदूंची माफी मागावी!

ज्यांची लायकी नाही त्यांनी आज संपूर्ण हिंदूना आदर असणाऱ्या शंकराचार्य यांचे हिंदुसाठी योगदान काय? अशी टीका केली.

सकाळ वृत्तसेवा

कळवा - ज्यांची लायकी नाही त्यांनी आज संपूर्ण हिंदूना आदर असणाऱ्या शंकराचार्य यांचे हिंदुसाठी योगदान काय? अशी टीका केली त्यांना जर हिंदू बद्दल आदर नसेल तर त्यांची लायकी काय अशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करून, अश्या बेताल वक्तव करणाऱ्याला भाजपने पक्षातून काढून संपूर्ण हिंदूंची माफी मागावी, तर नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन साफसफाई केली.

परंतु अटल सेतुवर ज्यांचे नाव लिहिले त्यांचा फोटो लावला नाही. अश्याना घराणेशाही बद्दल बोलण्याचा अधिकार पंतप्रधानांनावर टीका करून भाजपला वापर करून फेकून देण्याची भाजपची निती असल्याची टीका केली. तर ज्यांनी भगव्याशी गद्दारी केली, पक्ष चोरला, निशानी चोरली, ज्यांच्या कष्टाने जे मोठे झाले त्यांनीच गद्दारी केली.

परंतु खरे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत त्यांनी जनतेत उभे राहून आव्हान देऊन त्यांना गाढनारच अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कागदावर निकाल दिला. त्यांचा समाचार घेतला. कल्याण लोकसभा दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शनिवारी (ता. 13) ला कळवा विभागातील खारेगाव मच्छी मार्केट शाखेला भेट दिली.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आम्ही लढवय्ये शिवसैनिकांना भेटायला आलो असून, आपली गर्दी व निष्ठा पाहून उध्दव ठाकरे अंगार आहेत, बाकी सर्व भंगार आहेत. अशी मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. यावेळी जिल्हा प्रमुख केदार दिघे, शिवसेना सचिव व युवा नेते वरून सरदेसाई, खासदार राजन विचारे, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल गोरे, संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT