मुंबई

भाजपचेच प्रवक्ते म्हणतात 'त्या साध्वी मूर्ख आहेत, त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव'

सकाळवृत्तसेवा

मुंबई - देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा म्हणजेच CAA त्याचसोबत NRC वरून रान पेटलाय. देशभरात CAA आणि NRC च्या विरोधात आणि बाजूने आंदोलनं होताना पाहायला मिळतायत. देशभरात एकंदरच CAA आणि NRC वरून राजकारण तापलंय. अशात दोन्ही बाजूनी या विषयांवर मोठ्या प्रमाणात मतप्रदर्शन केलं जातंय. CAA आणि NRC च्या विषयांवर सर्व वृत्तवाहिन्यांकडून वारंवार डिबेट शो घेतले जातायत आणि त्याच्या खोलात जाण्याचा प्रयन्त केला जातोय. असाच एक कार्यक्रम आजही घेतण्यात आलेला. या शो-मध्ये काल पुण्यात उर्मिला मातोंडकर यांच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर डिबेट कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमांत अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

या चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांना 'उर्मिला मातोंडकर काय चुकीचं बोलल्या ? नथुराम गोडसे हिंदूच होता' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, उर्मिला मातोंडकर यांनी अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि उथळ वक्तव्य केलं, असं मधू चवहन म्हणालेत. पुढे बोलताना मधू चव्हाण म्हणालेत, "नथुराम हा हिंदू होता याच्यात काय आहे? तो गांधीजींचा खुनी होता होता, त्याची जात कुठली? मग श्रध्दानंदांना मारणार मुस्लिम होता असं आम्ही बोलायचं का ? इथे एखादा खुनी, बलात्कारी आहे, त्याची जात नसते, त्याची प्रवृत्ती पाहायची असते" अशी मांडणी करत होते. यावर या डिबेट-शोच्या अँकरने तुमच्याच साध्वी नथुराम गोडसेला हिरो ठरवतात असा प्रतिसवाल केला. यावर बोलताना मधू चव्हाण स्पष्टपणे म्हणालेत की,  'त्या साध्वी मूर्ख आहेत, त्या आमच्या पक्षात आहेत हे आमचं दुर्दैव आहे'. 

दरम्यान आता भाजप प्रवक्ते मधू चव्हाण य्यानी त्यांच्याच पक्षातील खासदाराबद्दल केलेल्या वक्तव्याने नवीन वाद निर्माण होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

bjp spokesperson madhu chavhan said sadhvi should not be in BJP and she is silly

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT