Chitra-Wagh 
मुंबई

'सर्व चाव्या फडणवीसांकडे तर मग पाठीत खंजीर का खुपसला?'

'फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली, हेही नसे थोडके'

दीनानाथ परब

मुंबई: "मराठा आरक्षण, (maratha reservation) ओबीसींचे (obc) राजकीय आरक्षण, धनगर आरक्षण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विषय असे सगळे कठीण प्रश्न सोडविण्याची चावी फक्त फडणवीस (devendra fadnavis) यांच्याकडे आहे. ते चतुर आणि चणाक्ष नेते आहेत, असा उल्लेख आजच्या सामनाच्या अग्रलेखात करण्यात आला आहे. उशीरा का होईना पण फडणवीस यांच्यातील नेतृत्वगुणांबाबत आपल्याला उपरती झाली, हेही नसे थोडके" अशा शब्दात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (chitra wagh) यांनी शिवसेनेला चिमटा काढला आहे. (Bjp state vice president chitra wagh slam shivsena)

"सर्व प्रश्न सोडवण्याची चावी फडणवीस यांच्याकडे आहे, याचे भान शिवसेनेला २०१९ मध्ये झाले असते तर फडणवीस पुन्हा युतीचे मुख्यमंत्री झाले असते आणि आज महाराष्ट्राच्या इज्जतीची जी लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत, ती टांगली गेली नसती. मात्र त्यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री करुन युतीचे सरकार पुन्हा आणण्याऐवजी आपण पाठीत खंजीर खुपसला" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

"एका कतृर्त्ववान नेत्याला मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवल्याचा आनंद आपल्याला मिळाला असेलच. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कायम दूर ठेवणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना काय वाटेल? याचा क्षणभर विचार केला असता, तर आपण महाआघाडीचा प्रयोग केला नसता" अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Lalit Modi and Vijay Mallya : Video-ललित मोदी अन् विजय मल्ल्याचा लंडनमधील पार्टीतील मजा-मस्ती व्हिडिओ तुम्ही पाहिली का?

Libra Soulmate Match: तुळ राशीची 'सोलमेट' कोण? जाणून घ्या राशीगणनेनुसार

SCROLL FOR NEXT