Congress BJP sakal
मुंबई

Bjp Vs Congress: भाजप इव्हेंट पार्टी आहे ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा आरोप !

सकाळ डिजिटल टीम

Bjp Vs Congress: देशातील विरोधी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया आघाडी’च्या माध्यमातून एकत्र आल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आमदार ‘जनसंवाद’ तसेच ‘सुसंवाद’ कार्यक्रम घेत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी नवी मुंबईतील काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत केला.

वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या परिवर्तन सभेनिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनिकेत म्हात्रे म्हणाले, जनतेला आता परिवर्तन हवे असून विष्णुदास भावे नाट्यगृहातील सभेतून त्या परिवर्तनाचा प्रारंभ होणार आहे. ही सभा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी आहे. देशातील जनता महागाई, बेरोजगारीला कंटाळली आहे; तर देशात तसेच राज्यात केवळ हुकूमशाही पद्धतीने कारभार हाकण्यात येत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये दोन आठवड्यांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

तरीदेखील सरकार कोणतेही भाष्य करत नसल्याचा म्हात्रे त्यांनी आरोप केला आहे, तर नवी मुंबईतही हीच परिस्थिती असून स्वतःच्या मालकीचे धरण असताना नवी मुंबईकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही, प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे करण्यात येत असल्याने काँग्रेसचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मंथन होणार आहे.

या सभेला भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT