BJP mla ravindra chavan  sakal media
मुंबई

निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मदतीने शिवसेनेला दाखवून देऊ - रविंद्र चव्हाण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : ठाणे महापालिका निवडणुकीचं (Thane Municipal corporation) बिगूल वाजताच दिव्यात शिवसेनेने (Shivsena) भाजपाला दणका दिलाय. भाजपाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत असतानाच यावर भाजपा (BJP) आमदारांनी अखेर मौन सोडलंय. गर्दी जमवण्यापेक्षा पाच निष्ठावान कार्यकर्ते पुरेसे असतात. त्यांच्या मदतीने काय करू शकतो हे शिवसेनेला दाखवून देऊ, असं आमदार रविंद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी म्हटलंय.

दिव्यातील भाजपच्या दोन मंडळ अध्यक्षांना शिवसेनेने आपल्या चमूत खेचल्याने दिव्यातील भाजपाचा नवीन मंडळ अध्यक्ष कोण याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती. निष्ठावंत पदाधिकाऱ्यावरच ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याचे बोलले जात असल्याने गेले अनेक वर्षे भाजपचा झेंडा हाती धरलेले रोहीदास मुंडे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत होते. अखेर रविवारी दिवा मंडळ अध्यक्षपदी मुंडे यांची नियुक्ती करत पक्षाने त्यांच्यावर दिव्याची जबाबदारी सोपविली आहे. रविवारी आयोजित कार्यक्रमात भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी रोहिदास मुंडे यांची दिवा मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले. यावेळी माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार संजय केळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थिती होते.

आमदार चव्हाण यांचा खासदार शिंदे यांच्यावर हल्लाबोल

भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत व निलेश पाटील यांना शिवसेनेने आपल्या चमूत घेत भाजपाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर आमदार चव्हाण यांनी सेनेवर निशाणा साधत म्हणाले, गर्दी जमविण्यापेक्षा आमच्याकडे निष्ठावान कार्यकर्ते किती आहेत हे पाहिले पाहीजे. निष्ठावान कार्यकर्ते पाच जरी असले तरी पाच जणांच्या जोरावर आपण काय करू शकतो हे आता दाखवून देऊ.

त्यानंतर चव्हाण यांनी थेट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवेकरांसाठी एक हॉस्पिटल करणे गरजेचे होते. मात्र त्यांच्या येथील बगलबच्चासाठी त्यांनी हे केले नाही. येथील भूखंड गिळंकृत करून त्यावर अनधिकृत बांधकाम त्यांना उभारायचे आहे असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी विकासाचा कसा बट्ट्याबोळ केला हे आपण सर्वच जाणतो. दिव्याची लोकसंख्या आज अडीच लाखाच्या घरात गेली असून येथे एक हॉस्पिटल व्हावे यासाठी भाजपा संघर्ष करेल असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : जेवणात झुरळ, पिन! COEP च्या मुलींच्या वसतिगृहात मनविसेचे तीव्र आंदोलन; विद्यापीठाला ७२ तासांचे अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: FIR न कळणारी लोकं पार्थ पवारांवर आरोप करताय - फडणवीस

Railway Ticket Booking : रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये केला मोठा बदल!

Eknath Shinde : राळेगणसिद्धीत अण्णा हजारे व उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ!

Ashish Shelar : ‘वंदे मातरम्’ हे विकसित भारताच्या दिशादर्शनाचे गीत’ आशिष शेलार; ‘ध्यास वंदे मातरम्‌चा’ पुस्तकाचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT