BJP worker Assault  sakal
मुंबई

डोंबिवली : डोळ्यात मिरचीची पूड फेकत भाजप कार्यकर्त्याला बांबूनं बेदम मारहाण

जखमी कटके यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपचे जुने कार्यकर्ते मनोज कटके यांच्या दुकानात घुसूून दोघांनी बांबूने बेदम मारहाण करीत, डोळ्यात मिरचीची पूड फेकून बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. जखमी कटके यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत असल्याची माहिती कल्याण पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते मनोज हे सोमवारी आपल्या पेट शॉपमध्ये बसले होते. सकाळी 10 च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या दुकानात ्अचानक शिरल्या आणि त्यांनी बांबूने कटके यांना बेदम मारहाण केली. ऐवढेच नाही तर त्यांच्या डोळ्यात मिरचिची पूड फेकून त्यांनी नंतर तेथून पळ काढला.

कटके हे ओरडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना रिक्षात घालून शास्त्रीनगर रुग्णालयात हलविले. याची माहिती मिळताच भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत कटके यांची चौकशी डॉक्टरांकडे केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी आमदारांना दिली आहे.

कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी देखील रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, भाजपचे मनोज कटके नावाचा कार्यकर्ता आहे. त्याला सकाळी पेट शॉप मध्ये असताना दोन अज्ञात इसम शॉपमध्ये आले.

बांबूनी मारहाण करीत डोळ्यात मिरचीची पूड देखील फेकण्यात आली आहे. त्याच्यावर शास्त्रीनगर रग्णालयात उपचार सुरु आहेत. याचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याद्वारे गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला असल्याचे ते म्हणाले. आमदार रविंद्र चव्हाण याविषयी म्हणाले, हे कोणी केले काय केले याची कल्पना नाही. परंतू ज्यांनी कोणी हा हल्ला केला तो अतिशय चुकीच्या पद्धतीने केला आहे असे आमचे मत आहे. पोलिस प्रशासन तर सत्ताधाऱ्यांचे मिंधे झाले आहेत. नागरिकांनी त्यांना सर्व माहिती दिल्यानंतर यंत्रणेने काही करायला हवे होते. पूर्ण दिवसात तपास झाला नाही तर यानंतर भाजप कल्याण जिल्हा काय घेईल हे आमचे नेते ठरवतील असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT