tushar bhosale
tushar bhosale esakal
मुंबई

मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारतो - आचार्य तुषार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोविड निर्बंधांबाबत (covid restriction) सोमवारी राज्य सरकारने सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्या आधारे मुंबई महापालिकेने (BMC) दिलासा देत दुकाने, (shops) आस्थापने आता रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रातील संसर्गदर कमी असलेल्या २२ जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने अखेर घेतला आहे. पण लोकल आणि मंदिरं खुली (temple opening) करण्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. त्याच मुद्यावरुन भाजपाच्या आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

"राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारला जातो" अशा शब्दात भाजपच्या आचार्य तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

"जेव्हा नवीन नियमावली तयार होते तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरावर बंदी कायम ठेवली जाते. पाच दिवसांनी श्रावण महिना सुरु होतोय. म्हणून या सरकारकडे आमची मागणी आहे की, "लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारं उघडा"' मंदिरांवर अवलून असलेल्या लाखो लोकांना जगू द्या असे तृषार भोसले यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT