The BJPs corporator Ulhasnagar 
मुंबई

भाजपचा स्वीकृत नगरसेवक फाईलचोर ; उल्हासनगरात खळबळ 

सकाळवृत्तसेवा

उल्हासनगर : पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कॅबिनमध्ये जाऊन फाईल चोरणाऱ्या भाजपचा स्वीकृत नगरसेवक प्रदीप रामचंदानीच्या कारनाम्याने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे. सीसी टीव्ही कॅमेऱ्याने याचा पर्दाफाश केला असून, 10 मेच्या दुपारची ही क्‍लिप रामचंदानीचा वाढदिवस असलेल्या 11 तारखेला रात्री उशिराने व्हायरल झाली. याप्रकरणी रामचंदानीला अटक झाली आहे. 

पालिका आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता महेश सितलानी यांनी रामचंदानीविरोधात मध्यवर्ती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रामचंदानीला अटक करण्यात आली आहे. रामचंदानीचे नगरसेवकपद तातडीने रद्द करावे, अशी मागणी

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी; तसेच मनसे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केली आहे. याबाबत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश तेजवाणी, परमानंद गेरेजा आदींनी महापौर मीना आयलानी यांना निवेदन दिले आहे. रामचंदानीच्या कारनाम्याने शहर भाजप तोंडघशी पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prada Kolhapuri Chappal : ‘प्राडा मेड इन इंडिया इन्स्पायरर्ड बाय कोल्हापुरी चप्पल’, कापशी पायतानचा ब्रॅण्ड प्राडाने स्वीकारला

Chhatrapati Sambhajinagar: न्यूझीलंडशी कराराने उद्योगांना बळ; मराठवाड्यातील उद्योजकांकडून स्वागत

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर :शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅप गोडवूनला भीषण आग

Ramdas Athawale: ‘भोंदूगिरी रोखण्यासाठी बुवा-बाबांची चौकशी व्हावी’: राज्यमंत्री रामदास आठवले, शिवाजी महाराजांवरील वक्तव्य वादग्रस्त!

Police Bribery Case Kolhapur : भुदरगड पोलिस ठाण्याच्या हवालदाराने ५० हजार रुपयांची लाच स्वीकारली अन्, रात्री उशिरा नाट्यमय घडामोडी, कारणही धक्कादायक

SCROLL FOR NEXT