corona vaccine sakal media
मुंबई

कोविड लसीकरणात BKC केंद्र अव्वल, नेस्को दुसऱ्या क्रमाकांवर

6 महिन्यात 2 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाचे रुग्ण (Corona patient) मोठ्या प्रमाणात आढळू लागल्यानंतर पालिकेने रुग्णांच्या उपचारांसाठी (BMC) तात्काळ कोविड केंद्र (Vaccination center) सुरु केली. आता तिथे लसीकरण केंद्रही सुरु आहेत. मुंबईत लसीकरणाला (Mumbai vaccination) सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत बीकेसी लसीकरण केंद्रांवर (BKC corona center) मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ( BKC corona vaccination center ranks top in corona vaccination-nss91)

लसीकरणात बीकेसी कोविड केंद्राने  बाजी मारली असून 6 महिन्यात 2 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात यश आले आहे. तर, त्यापाठोपाठ गोरेगाव नेस्को लसीकरण केंद्र आहे. दरम्यान, सध्या लसीचे डोसच कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दिवसाला फक्त 200 हून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याचे कोविड केंद्रांकडून सांगण्यात आले आहे. बीकेसी हे मुंबईतील सर्वात मोठे कोविड केंद्र आहे.

आतापर्यंत या लसीकरण केंद्रांत 2 लाख 64 हजार 892 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यात 2 लाख 48 हजार 101 नागरिकांना कोव्हिशील्ड लसीचा डोस देण्यात आला आहे. तर, कोव्हॅक्सिन लसीचे डोस 16 हजार 791 जणांना देण्यात आले आहेत. नेस्को गोरेगाव कोविड लसीकरण केंद्रात आतापर्यंत 2 लाख 19 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  यात 2 लाख कोव्हिशील्ड आणि 19 हजार कोव्हॅक्सिनचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरणासाठी बीकेसी सेलिब्रेटींचे आवडते ठिकाण

सामान्य नागरिकांसह बीकेसी लसीकरण केंद्रांवर सेलिब्रेटीही मोठी गर्दी करतात. आजपर्यंत बर्‍याच सेलिब्रेटींनी बीकेसी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेतली आहे. रुग्णांना चांगल्या उपचारांनंतर लसीकरणासंबंधितही चांगली सोय या ठिकाणी करण्यात आली आहे असे या कोविड केंद्राचे प्रभारी डाॅ. राजेश ढेरे यांनी सांगितले.

रुग्णांना उपचार देऊन बरे करण्यात ही बीकेसी कोविड केंद्र आघाडीवर होते. आणि आता लसीकरणात ही पहिल्या स्थानावर असल्याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया डाॅ. ढेरे यांनी दिली आहे. मुंबईत 29 जानेवारी पासून हेल्थकेअर आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू केले गेले. त्यानंतर, 1 मार्च पासून सामान्य नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत 2 लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण करण्यात यश आले आहे असे नेस्को लसीकरण केंद्रांच्या प्रभारी डाॅ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

दरम्यान, दहिसर कोविड केंद्रात आतापर्यंत 1 लाख 57 हजार 494 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात 12, 133 नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि दिड लाखांहून अधिक नागरिकांना कोव्हिशिल्ड देण्यात आले आहे. लस उपलब्ध झाली तर लसीकरणाचा आकडा आणखी वाढवता येईल. तरीही 1 लाखांचा टप्पा पार केला आहे, असे दहिसर लसीकरण केंद्रांच्या प्रभारी डॉ. दिपा श्रीयन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

Kagal Woman Dead Body : कागलमध्ये हाय व्होल्टेज टॉवरला महिलेचा मृतदेह; अनोळखी महिलेने ओढणीने गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Latest Marathi News Live Update : अनंत चतुर्दशीच्या दिवशी ॲक्वा मेट्रो लाईन ३ रात्रभर सुरू ठेवण्यात येणार

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT