मुंबई

मुंबईत नव्या रुग्णांचा भडका; कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या पार

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 24 : मुंबईत नव्या रुग्णांचा भडका उडाला असून काल 1,167 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 3,21,698 झाली आहे. काल  376 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,01,057 रूग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर वाढून  0.24 इतका झाला आहे. आतापर्यंत पर्यंत एकूण 31,85,334 कोविड चाचण्या करण्यात आल्या.

मुंबईत काल  केवळ 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकूण मृतांचा आकडा 11,453 इतका झाला आहे.रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 294 दिवसांवर आला आहे.

मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेले सर्व रुग्ण पुरुष होते. तर चार ही मृतकांचे वय 60 वर्षा वर होते.

मुंबईत 51 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 815 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,073 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 401 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

blast of corona patients in mumbai more than 1 thousand patients recorded in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT