मुंबई

विलगीकरणातील व्यक्तींवरही BMC चे लक्ष; संसर्ग रोखण्यावर भर कायम

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईसह उपनगरात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांवर पालिकेने लक्ष केंद्रीत केले असताना विलगीकरणात असणाऱ्या आणि विलगीकरण केंद्रात काम करणाऱ्या कर्मचार्यांची ही विशेष काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोनाच्या रुग्णांसह विलगीकरणात असणाऱ्या व्यक्तींवरही नजर ठेवली जात आहे. जर एखाद्या संशयित व्यक्तीला किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तीला आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवले तर त्यांच्या चाचण्या केल्या जातात. मात्र, तिथला जो स्टाफ आहे त्यांच्या देखील चाचण्या केल्या जात असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

स्टाफ म्हणजे रुग्णांना जेवण देणारे, वॉर्ड्सची स्वच्छता ठेवणारे किंवा तिथले सुरक्षारक्षक अशा सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे, संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

मुंबईतील आयसोलेशनची सद्यपरिस्थिती -

मुंबईत 965 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून 5 हजारांहून अधिक होम आयसोलेशनमध्ये आहेत. 41 लाख 15 हजार 500 व्यक्तींनी घरगुती अलगीकरण पूर्ण केली आहेत. राज्यात 5 लाख 12 हजार 587 घरगुती अलगीकरणात असून 4 हजार 403 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत. 

संसर्ग रोखण्यावर विशेष भर - 

सध्या मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. मात्र, त्यासोबतच संसर्ग रोखण्यासाठी विशेष भर दिला जात आहे. आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल झालेल्या प्रत्येकाची चाचणी केली जात आहे. शिवाय, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली जात आहे. जेणेकरुन ते संसर्ग पसरवू नये याची विशेष दक्षता घेतली जात आहे, असेही काकाणी यांनी सांगितले आहे. 

BMC also focuses on isolation persons The emphasis is on prevention

-------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT