मुंबई

मुंबईकर, गणेश विसर्जनावेळी पालिकेचे 'हे' नियम लक्षात ठेवा; नाहीतर...

पूजा विचारे

मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येत आहे. या व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करावा असं आवाहन वारंवार मुंबई पालिका आणि सरकार नागरिकांना करत आहे. याच दरम्यान गणेशोत्सव २०२० विसर्जनावेळी भक्तांसाठी पालिकेनं काही नियम जाहीर केलेत. भक्तांनी विसर्जनावेळी पालन करावयाच्या आवश्यक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्यात.

जाणून घ्या विसर्जनावेळीचे नियम 

  1. जे भाविक घरगुती गणेशोत्सव साजरा करत आहेत, अशा भक्तांनी गणेशमूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे. 
  2. मुंबई शहरात एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. या विसर्जन ठिकाणी नागरिकांना किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जित करण्यास मज्जाव आहे. 
  3. समुद्रावर पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच गणेशमूर्तीचे चौपाटीवर विसर्जन करण्यात येईल. पालिकेद्वारे याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आली आहे. 
  4. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महापालिकेच्‍या २४ विभागांमध्‍ये सुमारे १७० कृत्रिम तलावदेखील निर्माण करण्‍यात आलेत.
  5. कृत्रिम तलावाजवळ राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर जाण्‍यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सदर कृत्रिम तलावाचा वापर लगतच्‍या भाविकांनी करणं बंधनकारक असेल.
  6. पालिकेच्या प्रत्येक विभागा अंतर्गत ७ ते ८ गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण केली आहेत. या संकलन केंद्रासंदर्भातली माहिती तसंच कृत्रिम तलावांची माहिती पत्त्यासह तसंच गुगल लोकेशनसह पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे.
  7. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सुपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा आणि आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करणं बंधनकारक असणार आहे.
  8. कंटेन्मेंट झोनमध्ये असणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचं आहे किंवा ते विसर्जन पुढे ढकलावयाचं आहे. सील असलेल्या इमारतींमधील गणेशमूर्तीचं विसर्जनाची घरीच व्यवस्था करावी, अशी सूचना देखील पालिकेनं दिली आहे.
  9. पालिकेनं विशेष व्‍यवस्‍था म्‍हणून ट्रकवर टाक्‍या किंवा इतर व्‍यवस्‍था करुन फिरती विसर्जन स्‍थळे निर्माण केलेली आहेत, त्‍याचाही लाभ भाविकांनी घ्‍यावा, असंही पालिकेनं सांगितलं आहे. 
  10. २०२० गणेशोत्‍सवा दरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.
  11. विसर्जना दरम्‍यान सोशल डिस्ट्न्सिंग, मास्‍क, सॅनिटायझर वापरणं इत्‍यादी आरोग्‍य संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन मुंबई पालिकेनं केलं आहे.

BMC announced New Rules for ganesh festival visrjan mumbaikars must be followed these

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT