मुंबई : महानगरपालिका (BMC) 3 ऑगस्ट रोजी भुमिगत जलवाहीन्यांची जोडणी, जलवाहीन्यांवर झडपा बसविणे, फ्लो मिटर बसवणे अशी कामे (water related work) हाती घेणार आहे. यामुळे फक्त एफ उत्तर आणि एफ दक्षिण प्रभाग वगळता सर्व विभागात 15 टक्के पाणी कपात (water supply problem) होणार आहे. तर, घाटकोपर,कुर्ला आणि अंधेरी पूर्व - पश्चिम, राममंदिर रोड, गोरेगाव येथील मोठ्या भागाला (western Mumbai) पाणी पुरवठा होणार नाही. असे महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे. ( BMC announces water supply problem on third august in mumbai-nss91)
3 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते रात्री 10.30 वाजे पर्यंत हे काम सुरु राहाणार आहे. त्यामुळे या काळात पाणी पुरवठ्यावर परीणाम होणार आहे. नागरिकांनी या काळात पाण्याचा जपून व काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन महानगर पालिकेने केले आहे.
या भागात पाणी नाही
अंधेरी पश्चिम - स्वामी विवेकानंद रोड,गुलशन नगर,आर.एम मार्ग गिल्बर्ट हिल,जुहू कोळीवाडा,क्रांतीनगर,विलासनगर,शक्तीनगर,कदमनगर,आनंद नगर,पाटीलपुत्र,चार बंगला,विरा देसाई रोड,मोरगाव,यादव नगर,कॅ.सावंत मार्ग,जोगेश्वरी स्टेशन मार्ग,सहकार मार्ग,बांदिवली टेकडी.
अंधेरी पूर्व -- बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, वांद्रे प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, पंप हाउस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, न्यू नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर के सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर,विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोळ डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र.
शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजुवाडी, विले पार्लेचा बहुतांश भाग, कुर्ला - विभाग क्रमांक 157 संघर्ष नगर, खैरानी मार्ग आणि परिसर, विभाग क्रमांक 158 यादव नगर, वृंदावन वसाहत, अंजली मेडिकल परिसर,विभाग क्रमांक 159 दुर्गामाता मंदीर रोड, लोयलका कंपाऊंड , भानुशाली वाडी, चर्च गल्ली व परिसर, घाटकोपर आनंद नगर उदंचन केंद्र व वर्षानगर उदंचन केंद्रावरुन पुरवठा होणारा परिसर, भटवाडी, बर्वे नगर, भीम नगर, गोळीबार मार्ग, जगदुषा नगर, रामजीव नगर, सिद्धार्थ नगर, गावदेवी, अमृत नगर, आझाद नगर, पारशी वाडी, काजू टेकडी, गंगावाडी इत्यादी, घाटकोपर (पश्चिम), गोरेगाव -बिंबीसार नगर,राम मंदीर, गोरेगाव पश्चिम पाणीपुरवठा खंडित राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.