BMC sakal
मुंबई

मुंबई : शिवसेनेला प्रशासनाचा दणका, 'ऑडीओ बुक्स'चा प्रस्ताव फेटाळला

मिलिंद तांबे

मुंबई : साहित्य हे वाचून त्याचे मुल्य आत्मसात करताना जी कौशल्य क्षमता (Skills capability) आणि विचार विकसीत होतात ते ऐकून होणे शक्य नाही, असे सांगत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने (BMC Authorities) विद्यार्थ्यांसाठी ध्वनिमुद्रित पुस्तिका (Audio books) तयार करण्याचा शिवसेनेचा ठराव नाकारला आहे. तसेच ध्वनिमुद्रित पुस्तिका तयार करणे हे ही अत्यंत खर्चिक बाब आहे.असेही प्रशासनाने नमुद केले. (bmc authorities rejects audio books proposal of shivsena)

पालिकेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासव्यतिरीक्त प्रसिध्द लेखकांच्या वाडमयाची ओळख होण्याची गरज आहे. ही ओळ फक्त वाचून समजणे अवघड जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रसिध्द लेखांचे वाड्मय नावाजलेल्या कलाकारांच्या आवाजात ध्वनिमुद्रीत करुन ऑडीओ बुक्स तयार करण्याचा ठराव शिवसेनेच्या शितल म्हात्रे यांनी मांडला होता. हा ठराव महानगर पालिकेने मार्च 2020 मध्ये मंजूरही केला होता.त्यावर प्रशासनाने भुमिका स्पष्ठ केली आहे. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वयामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त सुप्रसिध्द लेखकांचे वाङ्मय वाचून समजणे सुरुवातीला अवघड जाण्याची शक्यता असते.

परंतु काही कालावधीनंतर शब्दकोश, विविध वाङ्मयाचे स्वरूप आणि साहित्यकारांची शैली ओळखल्यानंतर साहित्य वाचण्यात मिळणारा आनंद इतका रसमय असतो की त्याची तुलना ऐकून समजण्याशी करता येत नाही, वाङ्मयाची रचना ही मूलतः वाचण्यासाठीच केली जाते. साहित्य वाचून त्याचे मूल्य आत्मसात करताना जी कौशल्ये, क्षमता आणि विचार विकसित होतात ते ऐकून होणे शक्य नाही.असे प्रशासनाने शिक्षण समितीच्या पटलावर मांडलेल्या उत्तरात नमुद केले आहे.

सुप्रसिध्द लेखकांचे वाङ्मय, नावाजलेल्या कलाकारांच्या आवाजामध्ये ध्वनिमुद्रित करुन, ध्वनिमुद्रित पुस्तिका तयार करणे ही अत्यंत खर्चिक बाब असणार आहे. तसेच वाङ्मयाचे वाचन हे प्रशिक्षित शिक्षकच प्रभावीपणे करू शकतात अशी शिक्षण विभागाची धारणा असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT