BMC Budget google
मुंबई

BMC Budget : अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी भक्कम तरतूद; मुंबईत बनणार हजारो कोटींचे रस्ते

या अर्थसंकल्पात रस्ते आणि बांधकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी ३ हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नमिता धुरी

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प ५२६१९.९ कोटी रुपयांचा आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प ४५९४९.२१ कोटी रुपयांचा होता. म्हणजेच यावर्षी १४.५२ टक्के वाढ झाली आहे.

या अर्थसंकल्पात रस्ते आणि बांधकामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. कोस्टल रोडसाठी ३ हजार ५४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड जोडरस्त्यासाठी १ हजार ६० कोटी रुपये देण्यात आले आहेत. हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

रस्त्यांच्या सुधारणेसाठी २८२५.६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुलांच्या कामांसाठी २ हजार १०० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे.

पर्जन्यजल वाहिन्यांसाठी २५७०.६५ कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्यासाठी १६८०.१९ कोटी रुपये, शिक्षण विभागासाठी ३३४७.१३ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

रुग्णालयांच्या बांधकाम आणि पुनर्विकासासाठीही अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ₹ ११० कोटी, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या बांधकामासाठी ₹ ११० कोटी, एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी ₹ ९५ कोटी देण्यात आले आहेत.

कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाच्या प्रस्तावित बांधकामासाठी ₹ ७५ कोटी, सायन रुग्णालय इमारतीच्या पुनर्विकासासाठी ₹ ७० कोटी, एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालयासाठी ₹६० कोटी, वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹५३.६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Attack: शुभम चव्हाण हत्या प्रकरणाचा बदला? २०२५ मध्ये नेमकं काय घडलं होतं? मंदार किवळेवर हल्ला, भावाने घेतला भावाचा बदला?

Sheikh Hasina: दिल्लीत नेमक्या कोणत्या भागात राहतात शेख हसीना? कुठली माहिती आली समोर?

Pune Shivajinagar Court attack: शिवाजीनगर कोर्टाबाहेरील हल्लेखोरांची ओळख पटली; पुणे पोलिसांकडून महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update: अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या निकृष्ट कामावरून संताप

IPL 2027 Auction : बेन स्टोक्ससाठी ३ संघ बक्कळ पैसा ओतणार, तिघांच्या खिशात ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम; कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT