BMC
BMC sakal media
मुंबई

छट पुजेसाठी BMC बांधणार कृत्रिम तलाव; राज्य सरकारकडून निर्देश

समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिका (bmc) 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या छट पुजेसाठी (chhat puja) कृत्रिम तलाव (Artificial lake) बांधण्याचा खर्च करणार आहे. राज्य सरकारडून (mva government) निर्देश आल्यानंतर आज पालिका प्रशासनाने (bmc authorities) त्याबाबत सुधारित परीपत्रक (circular) प्रसिध्द केले आहे. त्याच बरोबर छट पुजेला येणाऱ्याची गरज पडल्यास कोविड चाचणीही (corona test) करण्यात येणार आहे.

महापालिकेने 2 नोव्हेंबर रोजी परीपत्रक प्रसिध्द करुन समुद्र किनाऱ्यांवर छट पुजेला बंदी केली. कृत्रिम तलाव बांधून तेथे पुजेला परावनगी दिली होती.मात्र,त्याचा बरोबर हे कृत्रिम तलाव संबंधीतांना घाचली होती.या अटीवर कॉग्रेसने आक्षेप घेतला. याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारडून पालिकेला निर्देश देण्यात आले ‍.असे मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष,आमदार भाई जगताप यांं पत्रकार परीषदेत सांगितले.

पालिका प्रशासनाने याबाबत संध्याकाळी सुधारित परीपत्रक प्रसिध्द करत छट पुजेसाठी कृत्रिम तलाव बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक गरजेनुसार प्रभाग कार्यालया मार्फत कृत्रिम तलाव बांधण्यात येतील असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

दहा ठिकाणी कोविड लसीकरण

कॉग्रेसच्या वतीने दहा ठिकाणी कोविड लसिकरण करण्यात येईल असेही भाई जगताप यांनी सांगितले.तसेच नजिकच्या केविड लसिकरण केंद्रावरही लसीकरणाची सोय उपलब्ध करुन देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

उपस्थीतीची अट कायम

खुल्या प्रांगणात क्षमतेच्या 50 टक्के जास्तीत जास्त 200 लोकांना उपस्थीत राहाता येणार आहे.तर सभागृहात 50 टक्के आणि जास्तीत जास्त 100 व्यक्तींना उपस्थीत राहाता येणार आहे.ही अट कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli MIDC Blast Update: डोंबिवली अपघातस्थळी आणखी 3 मृतदेह सापडले, एकूण मृतांचा आकडा 11 वर

Share Market Today: शेअर बाजारातील विक्रमी वाढ कायम राहणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Rahul Gandhi : भाजपच्या दृष्टीने महिला दुय्यम;दिल्लीतील सभेत राहुल गांधींचे टीकास्त्र

Latest Marathi News Live Update: अंबादास दानवे डोंबिवली स्फोट दुर्घटनास्थळी

Malaysia Masters : दुसऱ्या फेरीत कोरियाच्या यू जिनविरुद्ध तीन गेममध्ये सिंधूचा संघर्ष

SCROLL FOR NEXT