मुंबई

आयुक्तांचे प्रयोगशाळांना निर्देश, कोरोना चाचणीच्या अहवालांबद्दल मुंबई महापालिकेचा 'मोठा' निर्णय

सकाळवृत्तसेवा

मुंबई : प्रयोगशाळांनी कोरोना चाचणीचा अहवाल संबंधितांना न कळवता महापालिकेला द्यावा. त्यानंतर महापालिका या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करेल, असे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी शनिवारी दिले. त्यावर दोन-तीन दिवसांत कार्यवाही सुरू होणार आहे. 

कोरोना चाचणीचा अहवाल प्रयोगशाळांकडून रुग्णांना दिला जातो. अहवाल पॉझिटिव्ह असल्यास रुग्ण आणि कुटुंबीय गोंधळून जातात. रुग्ण स्वत:च धावाधाव करत असल्यामुळे धोका अधिक वाढतो. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचणीचा अहवाल रुग्णाला न देता महापालिकेला देण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रयोगशाळांना दिले. परंतु, या नव्या पद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहे. सध्या रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी सात ते 13 तासांचा कालावधी लागतो. रुग्णालयात जागा न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे रुग्णाला तत्काळ अहवाल न मिळाल्यास संभ्रम अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्तांनी शनिवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नव्या पद्धतीने रुग्णांंना दाखल करून घेण्याचेे निर्देश दिले आहेत. प्रयोगशाळांकडून पॉझिटिव्ह असल्याचा संदेश मिळाल्यानंतर अनेकदा रुग्ण घाबरून जातात किंवा महापालिकेकडून संपर्क होण्याआधीच रुग्णालयांची शोधाशोध करू लागतात. त्यातून इतरांना बाधा होण्याची शक्यता असते. हा गोंधळ व धावपळ टाळता यावी, त्यांना दिलासा देता यावा यासाठी ही पद्धत अवलंबली जाणार आहे, असा दावा प्रशासनाने केला. रुग्णालये किंवा वैद्यकीय तज्ज्ञांनी तातडीच्या प्रकरणांमध्ये कोरोना चाचणी करावयास सांगितले असल्यास, प्रयोगशाळांना थेट रुग्णालयास अहवाल कळवता येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

अशी होणार प्रक्रिया : 

कोरोना रुग्णांची यादी तातडीने महापालिकेच्या आरोग्य खात्याकडे पाठवावी. आरोग्य खात्याने प्रशासकीय विभागनिहाय रुग्णांची नावे संबंधित विभाग कार्यालयांना तातडीने पाठवावीत. विभाग कार्यालयांमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या आंतरवासितांचे (इंटर्न) पथक नेमावे. या पथकाने रुग्णांशी संपर्क साधून चर्चा करावी, त्यांची माहिती घ्यावी व रुग्णालय अथवा केंद्रात नेण्यासाठी समन्वय साधावा.

BMC commissioner iqbalsingh chahal asked hospitals to send corona report to BMC first 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT