chahal.jpeg 
मुंबई

टेन्शन घेऊ नका, मुंबईतील कोरोना स्थितीबद्दल मोठी दिलासादायक माहिती

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज १० हजारच्या घरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेत. 'ब्रेक द चेन'चं आव्हान केलं आहे. कोरोना रुग्णवाढीचा रोजच्या आकडा पाहून चिंताजनक, भयावह, स्फोट अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटतात. पण आज या संदर्भात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली. "मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. घाबरुन जाऊ नका, चिंता करु नका" असे त्यांनी सांगितले. 

"मुंबईत १० फेब्रुवारीला दुसरी लाट सुरु झाली. तेव्हापासून आज सात एप्रिलपर्यंत मागच्या ५६ दिवसात १ लाख ६० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या तुम्हाला इतकी दिसत असली, तरी प्रत्यक्षात १ लाख ३५ हजार कोरोनाबाधितांमध्ये या आजाराची लक्षणेच नव्हती. त्यांना  औषधोपचाराची गरज नव्हती" असे इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. 

"१ लाख ६० हजार कोरोनाबाधितांपैकी  २७ हजार रुग्णांमध्ये लक्षणे दिसत होती. त्यातल्या निम्म्या लोकांनी घरीच उपचार केले. आजही मुंबईत १० हजारच्यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होऊ शकते. पण १० हजारचा आकाडा ऐकून घाबरुन जाऊ नका. त्यातले  ८७०० रुग् म्हणजे ८७ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीयत. फक्त १३०० रुग्णांमध्ये लक्षणे आहेत. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण बेड्सची मागणी करतात. म्हणजे दिवसाला ६५० बेड्स लागतात.  आता दररोज तितकेच बेड्स रिक्त होत आहेत. १४ दिवसानंतर रुग्ण बरे होऊन घरी जातात. एकप्रकारचं हे चक्र तयार झालंय" अशी माहिती चहल यांनी दिली. 

लसीकरणाबद्दल म्हणाले...
मुंबईत दररोज १ लाख नागरिकांचं लसीकरणाचं लक्ष्य आहे.  घरोघरी जाऊन  लसीकरणाची परवानगी द्या. आतापर्यंत मुंबईत १४ लाख लोकांचं लसीकरण झालय. मुंबईत ३६ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपब्ध आहेत. १०८ लसीकरण केंद्र आहेत, अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा घसरलं! उच्चांकापासून तब्बल ₹31,000 नी स्वस्त; आज महिन्यातील सर्वात कमी दर, काय आहे भाव?

Gokul Dudh Sangh Crisis : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईने मुश्रीफांना मोठा धक्का; भाजप-महाडिक गटासोबतचा दुरावा नडला!

Angaraki Sankashti Chaturthi 2026: श्रीगणेशाच्या कृपेने पूर्ण होतील सर्व मनोकामना; फक्त ‘या’ सोप्या पद्धतीने भरा इच्छापूर्ती कलश

"विराट भाऊ, मला कॉल कर!" भर मैदानात स्टंप उडवल्यानंतर आयशोस्पीडचा राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Latest Marathi News Live Update : फाशी नाही ठेचून मारा, नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT