BMC sakal media
मुंबई

मुंबई : पालिकेच्या ८२,४१० कोटींच्या मुदत ठेवी

कोरोना उपचारांसाठी पाच हजार कोटींचा खर्च

मिलिंद तांबे

मुंबई : विविध बँकांमध्ये २०१७ पर्यंत मुंबई पालिकेच्या (bmc) ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या ठेवी (money deposits) होत्या. मात्र ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत या ठेवींमध्ये तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वाढ (Financial graph increase) होऊन हा आकडा आता ८२,४१०.४४ कोटी रुपयांवर गेला आहे. पालिकेच्या तिजोरीत (BMC Fund) अशीच वाढ होत राहिली तर आगामी काही वर्षांत पालिका लवकरच एक लाख कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा टप्पा पार करेल.

पालिकेच्या या मुदत ठेवींमध्ये कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन, उपदान निधी, इतर विशेष निधी, कंत्राटदार आणि इतर पक्षकारांच्या ठेव रकमा आहेत. पालिकेने मुंबईची वाढती तहान भागविण्यासाठी काही नवे पाणी प्रकल्प योजले आहेत. त्यासाठी कोस्टल रोड, मिठी नदी यांसारखी विकासकामे आदींसाठी पालिकेने काही प्रमाणात निधी राखून ठेवला आहे. त्या निधीचा वापर भविष्यातील प्रस्तावित प्रकल्पांसाठी केला जाणार आहे.

पालिकेच्या विविध बँकांत जून २०१७ पर्यंत ६४ हजार ४८२ कोटी ६४ लाख रुपयांच्या मुदत ठेवी होत्या. ऑक्टोबर २०१७ मध्ये त्यात वाढ होऊन त्या ६४ हजार ७४१ कोटी ९२ लाख रुपयांवर पोहोचल्या होत्या. त्यावेळी पालिकेला किमान ५.९५ टक्के ते ६.७५ टक्के इतके दरसाल व्याज मिळत होते. मात्र, काळाच्या प्रवाहात व्याज दरात घसरण होत गेली. मार्च २०१८ पर्यंत पालिकेच्या विविध बँकांत ६९ हजार १३५ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी होत्या; तर ३० जून २०१९ पर्यंत त्यात मोठी वाढ होऊन विविध बँकांतील मुदत ठेवींची रक्कम ७९ हजार ९१ कोटी ४६ लाख रुपयांवर गेली होती.

पालिकेला विविध बँकांतील व्याजापोटी ३,३१८ कोटींचे व्याज प्राप्त झाले आहे. त्यामुळे पालिकेची विविध बँकांतील मुदत ठेवींची रक्कम ८२ हजार ४१० कोटी ४४ लाख रुपयांवर गेली आहे. पालिकेने गेल्या ऑगस्ट महिन्यात विविध बँकांमध्ये एक ते दोन वर्षांच्या मुदतीसाठी किमान २ कोटी ते ५३१ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची गुंतवणूक केली आहे. एकूण ९०७१.९९ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून त्यापोटी पालिकेला पुढील दोन वर्षांत ४२८.३१ कोटी रुपयांचे व्याज मिळणे अपेक्षित आहे.

कोरोना प्रतिबंधक उपायांसाठी मोठा खर्च

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेचा मोठा निधी खर्च झाला. बाधितांवर पालिका रुग्णालयांत मोफत उपचार करण्यात आले. शहरात कमी कालावधीत जम्बो कोविड केंद्रे उभारण्यात आली. वैद्यकीय उपाययोजना आणि अन्य कामांसाठी पालिकेच्या तिजोरीमधून अंदाजे ५ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT