politics
politics esakal
मुंबई

'एवढंच होतं तर..'; वरळी दुर्घटनेवरून पेडणेकरांची नितेश राणेंवर टीका

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि बीएमसीला धारेवर धरले आहे.

मंबई : मंबईतील (Mumbai) वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटात घडलेल्या घटनेवरून सध्या राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांची झोड उठवली जात आहे. या स्फोटाच्या घटनेवरून भाजपचे आमदार नितेश (Nitesh Rane) राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) आणि बीएमसीला (BMC) धारेवर धरले आहे. मात्र त्यांच्या टीकेला आता महापालिका महापौर किशोरी पडणेकर (Kishori pednekar) यांनी प्रतित्युर दिले आहे.

त्या म्हणाल्या, नितेश राणेंना एवढं का सिरीयस घेत आहात. त्यांच्या म्हणण्याला काहीच बेस नाही. फक्त राजकारणासाठी दिसतं आणि बोलतं राहायचं एवढंच काम ते करत असतात. इतका कळवळा होता तर मग यांच्यापैकी कोणी तरी पाठवली का रुग्णवाहिका ? शिवसैनिक आणि कार्यकर्तेच सुरुवातीला मदतीला धावले आहेत. त्यामुळे विनाकारण नितेश राणे यांनी राजकारण करु नये.

पुढे त्या म्हणाल्या, वरळीतील घटना घडली त्यावेळी शिवसैनिक तातडीनं घटनास्थळी पोहोचले होते. उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात जखमींना दाखलही करण्यात आलं होतं. पोतदारला उपचार होणं शक्य नव्हतं. रुग्णवाहिका खरं तर कस्तुरबा रुग्णालयात येणं आवश्यक होतं मात्र, ती नायरला गेली. तेथे काही प्रमाणात उपचाराला उशीर झाला. या घटनेवेळी अनेकांची असंवेदनशिलता दिसल्याने २ डॉक्टर आणि एका नर्सला तातडीनं निलंबीत केलं आहे. त्या बाळाचे वडील नायर रुग्णालयातच होते. उपचारादरम्यान त्यांची परिस्थिकी नाजूक होती. आईला ५६ टक्के भाजलं होतं.

महापौर पेडणेकरांनी आशिष शेलार यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, आशिष शेलार उद्विग्न, भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना त्यांच्या पक्षात काही स्थान राहीलेलं नाही, एक साधा आमदार घेऊन करु काय? असा त्यांना प्रश्न पडलेला दिसतो. आपण कोणाविषयी बोलतोय याची त्यांना जाणिव नाही. माझ्याबाबतीत त्यांनी केललं वक्तव्य हे चुकीचं आहे. उत्तर प्रदेशात ६० लहान मुलं ऑक्सिजनविना तेव्हा तुमच्या संवेदना कुठे गेल्या होत्या, असा सवालही त्यांनी शेलार यांना केला आहे. शेलार हे डोक्यावर पडले असून सत्ता गेल्याने तडफड करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र! दहा हजारांवर गावे, वाड्यांत दुर्भिक्ष; सरकारची डोळेझाक

RBI : रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला मिळणार सर्वोच्च लाभांश

Arvind Kejriwal : खासदार स्वाती मालिवाल प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी

Marathi Student : मराठी विद्यार्थ्यांना परत आणा; किर्गिझस्तानमध्ये राज्यातील ५०० जण अडकल्याची भीती

Water Supply : हरियाना सरकारने रोखले दिल्लीचे पाणी; आतिशी मार्लेना यांचा भाजपवर आरोप

SCROLL FOR NEXT