kishori-pednekar sakal media
मुंबई

आरोग्य सेविकांनी खात्री केल्यानंतरच लसीकरण, महापौरांची माहिती

- समीर सुर्वे

मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचे (old age patients) कोविड लसीकरण (Corona vaccination) सोमवार पासून सुरु होणार आहे. या लसीकरणासाठी अर्ज आल्यानंतर पालिकेच्या (BMC) आरोग्य सेविका खात्री करुन घेतील. त्यानंतरच लसीकरण करण्यात येईल असे महापौर किशोरी पेडणेकर (mayor kishori pednekar) यांनी स्पष्ट केले. (kishori pednekar says health department will ensure about vaccination process- nss91)

घरोघरी लसीकरणाला मर्यादा आहेत.यात,प्रामुख्याने लसीच्या कुपीतून एक डोस दिल्यानंतर ती कुपी चार तासानंतर वापरता येत नाही.एका कुपीत दहा जणांना लस देता येते.त्यामुळे त्या परीसरात दहा जण असणे गरजेचे आहे.तसेच,अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांनी अर्ज केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य सेविका स्वत: पाहाणी करुन खात्री करुन घेतील असेही महापौरांनी सांगितले.मुंबईत चार हजारहून अधिक व्यक्तींचे घरी जाऊन लसीकरण करायचे आहे.प्रायोगिक तत्वावर महानगर पालिकेने अंधेरी पुर्व मध्ये असे लसिकरण केले आहे.मात्र,यातील 14 हून अधिक व्यक्ती या वृध्दाश्रमातील होत्या.तर,23 व्यक्तींना घरी जाऊन लस दिली आहे.असे 37 जणांचे लसीकरण प्रायोगिक तत्वावर केले आहे.

कोविडची लस घेतल्यानंतर किमान 30 मिनिटे संबंधीत व्यक्तीला लसीकरण केंद्रात देखरेखी खाली ठेवले जाते.अशा परीस्थीतीत चार तासात एक कुपी संपवणे शक्‍य नाही.त्यामुळे नागरीकांकडून संबंधीत व्यक्तीला लस दिल्यानंतर त्यांचा नेहमीच डॉक्‍टर घरी उपस्थीत राहील याचीही खात्री करण्यात येणार आहे.असेही महापौरांनी सांगितले. "अंधरुणाला खिळलेल्या व्यक्तींचे लसीकरण होणे गरजेचे आहे.मात्र,यात अनेक मर्यादा आहे.यावर तोडगा काढून हे लसीकरण करण्यात येईल'.-किशोरी पेडणेकर,महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT