kishori pednekar Esakal
मुंबई

'तिसरी लाट भयानक असू शकते, ओमिक्रॉन तीनपट वेगाने वाढतोय'

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान स्वत: राज्यांना अलर्ट करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री लॉकडाऊन करावे लागेल सांगत आहेत.

मुंबईच्या (BMC) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी कोरोनाच्या (Corona) वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वाढत असून नागरिकांनी नियमांचे पालन करावे असं म्हटलं आहे. तसंच मी स्वत: लग्न, समारंभाला जाणार नाही असं म्हणत नागरिकांनीसुद्धा कार्यक्रमांना गर्दी करणं टाळावं असं म्हटलं. लोकांकडून बेजबाबदारपणा केला जात असल्याचं म्हणताना त्यांनी म्हटलं की, गर्दीत काही लोक मास्क लावत नाहीत. मास्क न लावणारे धोक्यात आणू शकतात असंही पेडणेकर यांनी म्हटलं.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना पेडणेकर म्हणाल्या की, तिसरी लाट भयानक असू शकते. पंतप्रधान स्वत: राज्यांना अलर्ट करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री लॉकडाऊन करावे लागेल सांगत आहेत. संचारबंदी सगळीकडे सुरु झाली आहे. आता लोकांनाी गर्दी करू नये, मास्क लावा.

ओेमिक्रॉनचा वाढीचा वेग हा तीनपट असल्याचंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तसंच मुंबई महापालिका ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली. कोविड सेंटर उभारणीसाठी खर्च होणार आहे. जम्बो कोविड सेंटर मनुष्यबळासह सज्ज ठेवणार असल्याचंही पेडणेकर यांनी सांगितले. लक्षणे नाहीत असे रुग्ण अधिक असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.

लोकांनी आता नियम पाळावेत. मार्शल्सनी मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करावी. फक्त कारवाई केली जाते म्हणून नव्हे तर काळजी म्हणून मास्क घालावा. माझी विनंती आहे की बाहेरुन मुंबईत येणाऱ्यांनीसुद्धा नियमांचं पालन करावं असंही त्यांनी म्हटलं.

सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या बाळाला पाहण्यासाठी किशोरी पेडणेकर आल्या होत्या. त्याबाबत माहिती देताना पेडणेकर यांनी म्हटलं की, बाळाला आम्ही दत्तक घेणार आहोत. बाळाची स्कीन ड्राफ्टिंग केली आहे. तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे बाळाची विचारपूस डॉक्टरांकडे करत असतात. तसंच बाळाच्या आजी आजोबांशी बोलून त्याला दत्तक घेता येईल का याचीही चर्चा करणार आहे. अजुन दीड महिना बाळ रुग्णालयात राहील असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT