kishori pednekar  e sakal
मुंबई

''मुंबई लहान मुलांच्या लसीकरणासाठी सज्ज, पण मार्गदर्शक तत्वांची वाट''

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईमध्ये लोक कोरोना (coronavirus) नियमांचं पालन करतात. त्यामुळे आता कोरोना मृत्यूंची संख्या शून्यावर आली. कोरोना कमी झाला आहे. पण संपला नाही. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची भीती कमी झाली असली तरी तिसरी लाट येणार नाही, असं नाही. त्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, असे मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC mayour kishori pednekar) म्हणाल्या.

मुंबईत लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र असतील. लसीकरणापासून कोणालाही वंचित ठेवायचे नाही. त्यामुळे फिरते लसीकरण केंद्र सुरू करतोय. मुंबई महापालिका लहान मुलांचे लसीकरण करायला सज्ज आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांची प्रतिक्षा आहे. तसेच ३४३ कोविड रुग्णांचे नमुने घेतले होते. त्यात डेल्टा प्लसचे रुग्ण कमी झाले आहेत, असेही महापौर म्हणाल्या.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टास्क फोर्ससोबत बैठक आहे. मात्र, निर्बंध हटवायचे की नाहीत याबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल. तसेच राज्य शासनाकडून आलेल्या आदेशाचं आम्ही पालन करू, असेही महापौर म्हणाल्या. तसेच लोकल प्रवासाबाबत देखील त्यांनी भाष्य केलं असून लोकल प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT