Mayor kishori pednekar sakal media
मुंबई

'भाजप नेते महापालिकेतील मिनिट्स बदलण्याचा प्रयत्न करताहेत'

टिपू सुलतानच्या नावाला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खंडाजंगी सुरु आहे. दरम्यान मुंबई महापालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेला भाजपा अनेक कारणांवरून धारेवर धरतं असतात. (BMC) दरम्यान आज महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपावर (BJP) टीकास्त्र सोडले आहे. भाजपा जुन्या कडीला उतआण्याच काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. टिपू सुलतानच्या नावाला शिवसेनेचा (Shivsena) पहिल्यापासून विरोध कायम आहे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला राणी लक्ष्मीबाई यांच नाव देण्यात यावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.

भाजपावर टीका करताना पेडणेकर (Kishori pednekar) म्हणाल्या, भाजपचे नेते महापालिकेतील मिनिट्स बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे सध्याचे आमदार अमित साटम यांनी नगरसेवक असताना एम पूर्व वॉर्ड मधील बाजीप्रभू देशपांडेपासून सुरु होणाऱ्या रफिकनगर येथील नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक चार टिपू सुलतान मार्गासाठी निधीसाठी प्रयत्न केले होते. महापालिकेच्या मिनिट्समध्ये दोन रस्त्यांना नाव देताना भाजपकडून इतिहासाचे दाखले पुराव्यानिशी उघड होत आहेत, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, टिपू सुलतान हा हिंदू विरोधी होता. त्याने हिंदूंची अनेक मंदिरे उध्वस्त केली, हजारो हिंदूंचे धर्मांतरण केले तसेच अनेक हिंदूंची क्रूरपणे हत्या केली आहे. अशा क्रूर आणि हिंदू विरोधी टिपू सुलतानचे नाव क्रीडा मैदानास देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबवण्यात यावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW, World Cup: भारताचा सलग दुसरा पराभव! एलिसा हेलीच्या ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठे लक्ष्य पार करत घडवला इतिहास

Mumbai: एसटी संघटनांमध्ये कुरघोडीचे राजकारण! आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा सुटणार

Water Taxi: मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार? मोठी अपडेट आली समोर, वाचा सविस्तर...

INDW vs AUSW: एलिस पेरी आऊट न होताच गेली मैदानाबाहेर, पण भारताविरुद्ध कर्णधार एलिसा हेलीचं शतक

Kolhapur : आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रकरणात मोठी अपडेट, बहीण-भावानेच केलेलं कांड; मैत्री करत...

SCROLL FOR NEXT