मुंबई

कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी BMCचा कोट्यावधींचा खर्च; आजवर 11,249 जणांवर अंत्यसंस्कार 

मिलिंद तांबे

मुंबई  : कोरोना मृतदेह हाताळण्यासाठी पालिकेने आजवर 10 कोटी 99 लाख रुपयांचा खर्च केला आहे. मुंबईत आतापर्यंत 11,249 मृतदेह हाताळले गेले आहेत. मृतदेह हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रोत्साहन म्हणून पालिकेने प्रत्येकी 500 रुपये भत्ता सुरू केला आहे. 

मार्च ते ऑगस्ट यादरम्यान मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे कोरोना मृतदेह बंदिस्त करण्याचे जोखमीचे काम करताना पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीती होती. जीव धोक्‍यात घालून हे काम केले जात होते, यासाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही सुरक्षा कवचही पुरवण्यात आलेले नव्हते. त्यानंतर पालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना विमा कवच पुरवले. याशिवाय मृतदेह बंदिस्त करणारे पालिकेचे नियमित कर्मचारी, कंत्राटी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना मृतदेह बंदिस्त करण्यासाठी 500 रुपये प्रोत्साहन भत्ता सुरू करण्यात आला. या कामात दोन व्यक्तींचा सहभाग होता. त्यांना एका मृतदेहामागे एक हजार रुपये दिले जातात. 

गेले नऊ महिने कोरोनाने दगावलेल्यांवर पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार केले जात आहेत. रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह व्यवस्थित करणे, त्याला आवरणात गुंडाळणे, मृतदेहावर माहितीचा बिल्ला बांधणे, मृतदेह शवागारात पोहोचवणे आदी कामे कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. पालिकेने याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता सुरू केला. 

सुरुवातीला कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे भय प्रचंड होते. सुरक्षेची साधनेही कर्मचाऱ्यांना मिळत नव्हती. आरोग्य विभागाने विमा कवच तसेच प्रोत्साहन भत्ता देण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांना भत्ते नियमित मिळत असल्याने कर्मचारीही सुरक्षेबाबत निश्‍चिंत झाले आहेत. कर्मचाऱ्यांना हे भत्ते यापुढेही सुरू राहिले पाहिजेत. 
- प्रदीप नारकर,
चिटणीस म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई 

BMC spends billions to handle corona bodies in mumbai

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT