bmc 
मुंबई

Lockdown : मजुरांच्या आणि गरजुंच्या जेवणांवर महापालिका दररोज करते इतक्या कोटींचा खर्च

सकाळवृत्तसेवा

मुंबई : मुंबईतून सुमारे एक लाख परप्रांतीय मजूर निघून गेले आहेत. महापालिका मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत साडेतीन लाख मजुरांना जेवण देत होती; ही संख्या अडीच लाखांपर्यंत कमी झाली आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महापालिकेने स्थलांतरित मजुरांना दोन वेळचे जेवण देण्यास सुरुवात केली. महापालिकेने 30 एप्रिलला 7300 मजुरांना जेवण दिले होते, 1 मेपर्यंत ही संख्या साडेतीन लाखांहून अधिक होती. केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांत जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मागील पंधरवड्यात मुंबईतून सुमारे एक लाख मजूर गेले आहेत, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

गरजू कुटुंबांचीही सोय
स्थलांतरित मजुरांबरोबरच रोजंदारी, घरकाम व इतर लहानमोठी कामे करणाऱ्या कुटुंबांनाही महापालिकेने जेवण देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली. सध्या अशा एक लाख व्यक्तींना रोज दोन वेळचे जेवण दिले जात आहे. स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली असली; तरी अन्य गरजूंनाही महापालिका जेवण देत आहे. दररोज सात लाखांहून अधिक जेवणाची पाकिटे वितरित केली जातात; म्हणजे साडेतीन लाख व्यक्तींना जेवण दिले जात आहे.

पावणेदोन कोटींचा खर्च
महापालिका विविध संस्था, हॉटेलांकडून जेवण बनवून घेते. जेवणाच्या प्रत्येक पाकिटामागे 28 ते 30 रुपये दिले जाता. अन्नपाकिटे वाटण्यासाठी महापालिका दररोज एक कोटी 80 लाख रुपये खर्च करत आहे.

bmc spends crores of rupees every day on meals for the workers and the needy

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT