मुंबई

Corona Vaccination: म्हणून आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरण

पूजा विचारे

मुंबई: आजपासून दोन शिफ्टमध्ये कोरोना लसीकरणास सुरुवात होत आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. सकाळी ७ ते २ मध्ये पहिली शिफ्ट तर दुपारी २ ते रात्री ९ अशी दुसरी शिफ्ट असेल. याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण करता येत होतं. 

गेल्या काही दिवसात कोविन अ‍ॅपमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर
तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण वाढवण्यासाठी सर्व लसीकरण केंद्रांत पाळ्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारने कंबर कसली.  त्यामुळे, पालिकेतील लसीकरण केंद्रासोबत राज्यभरातील लसीकरण केंद्रात 2 पाळ्यांमध्ये लसीकरणास सुरूवात करून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर  मार्च महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं होतं की, टप्प्प्याटप्प्याने दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. 

दरम्यान मुंबईत आतापर्यंत 10 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले आहे. एकूण उद्दिष्टाच्या केवळ 20 टक्के लसीकरण झाले आहे. त्यात आता सरसकट 45 वर्षे वयावरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याने ताण अधिक वाढणार आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे लवकरात लवकर लसीकरण उरकायचे असल्याने पालिका प्रशासनाला त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण 40 लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत 2 शिफ्टमध्ये लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण 20 टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत 10 लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bmc start Corona vaccination two shifts morning 7 to 2 and afternoon 2 to 9

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT