BMC sakal media
मुंबई

मुंबई : भावी नगरसेवक कोट्याधीश; निवडून येण्यापूर्वीच 650 कोटींची लॉटरी

समीर सुर्वे

मुंबई : महानगर पालिकेच्या (bmc) स्थायी समितीत (Sthayi samiti) आज 2022-23 या वर्षाच्या 45 हजार 949 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला (budget) 650 कोटी रुपयांच्या फेरफारासह मंजूरी देण्यात आली. पुढील निवडणुकीत निवडून येणाऱ्या नगरसेवकांसाठी हा निधी राखून ठेवण्यात येणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant jadhav) यांनी सांगितले. प्रत्येक नगरसेवकाला 1 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. अर्थसंकल्प मंजूर होत असताना भाजपने (bjp) सभात्याग केला.

पालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी 3 फेब्रुवारी रोजी हा अर्थसंकल्प स्थायी समितीत मांडला होता.आता स्थायी समितीच्या मंजूरीनंतर अर्थसंकल्प अंतिम मंजूरीसाठी महासभेच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.विद्यमान नगरसेवकांची मुदत 7 मार्च रोजी संपणार असून त्यापुर्वी महासभेला हा अर्थसंकल्प मंजूर करावा लागेल.अन्यथा 10 मार्च नंतर अर्थसंकल्पाला महासभेची मंजूरी मानण्यात येईल.

स्थायी समितीच्या 26 सदस्यांपैकी 12 सदस्यांची चर्चेत सहभागी होऊन आपले मुद्दे मांडले.त्यानंतर आज 650 कोटी रुपयांच्या फेरफारासह अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.नवे नगरसेवक निवडून आल्यावर त्यांच्या शिफारशीनुसार हा निधी वापरला जाईल असे जाधव यांनी सांगितले.

तीन वर्ष करवाढ नको

कोविडमुळे सामान्यांच्या अर्थकरणावर परीणाम झाला आहे.तर,अर्थसंकल्पात मालमत्ता कर वाढीसह इतर शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे नमुद आहे.त्यामुळे पुढील तीन वर्ष तरी करवाढ करण्यात येऊ नवे अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली.त्याच बरोबर वरळीतील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी रुपयांचा निधी मिळतो.मात्र,गोवंडीतील शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही.अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

कंत्राटदारांसाठी फेरफार

ही फेरफार नागरीकांच्या हितासाठी नाही कंत्राटदारांच्या हितासाठी आहे.असा आरोप करत भाजपने सभात्याग केला.या निधीतून करायची कामे निश्‍चित करण्यात आलेली नाही.मात्र,निधीची तरतूद करण्यात आली आहे.तर,अद्याप प्रभागांच्या सिमा ठरलेल्या नाहीत.या कामांची शिफारस कोणी केली आहे.असे प्रश्‍न भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी उपस्थीत केले.पालिकेच्या प्रचलित प्रथेनुसार नवी महानगर पालिका गठित झाल्यावर अतिरीक्त तरतूद करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली.

निधीचे समान वाटप होणार

नव्याने तयार होणाऱ्या 236 प्रभागात प्रत्येक 1 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाईल.त्याच बरोबर उर्वरीत निधीचे वाटप 24 प्रशासकीय प्रभागात समान करण्यात येईल.त्यामुळे प्रत्येक पक्षातील नगरसेवकांना समान निधी मिळणार आहे.असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नमुद केले.तसेच,प्रत्येक पक्षाला त्यांच्या संख्याबळानुसार निधी वितरीत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी नमुद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT