Corona Virus esakal
मुंबई

अत्यंत दिलासादायक! मुंबईची रुग्णसंख्या आठ हजारांच्याही खाली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढीस लागल्यानंतर कोरोनाचे निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत होते. अगदी वीस हजारांच्याही वर दैनंदिन रुग्णसंख्या सापडत होती. मात्र, आता ही रुग्णसंख्या कमी झालेली आहे. आज मुंबईची रुग्णसंख्या १० हजाराहून खाली आली आहे. सध्या मुंबईमध्ये ६०,३७१ सक्रिय रूग्ण आहेत. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रूग्णसंख्या काहीशी कमी नोंदविण्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Latest Corona Updates In Marathi)

आज मुंबईमध्ये एकूण ७ हजार ८९५ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. काल मुंबईमध्ये आज 10,661 नव्या कोरोना बाधितांची (Corona Cases In Mumbai) नोंद करण्यात आली होती.

आज नव्याने नोंदविण्यात आलेल्या रूग्णांपैकी ६,६३२ म्हणजेच ८४% टक्के रूग्णांना (Corona Symptoms ) कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आलेली नाहीत. तर, आज ६८८ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Corona Discharge ) यातील ९२ रूग्णांना ऑक्सिजनची (Oxygen Support) गरज भासली आहे. तर आज २१,०२५ रूग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर ९२% टक्क्यांवर नोंदविण्यात आला असून, रूग्ण दुपटीचा दर ४८ दिवसांवर पोहोचल आहे. सध्या मुंबईमध्ये ५४ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT