BMC sakal media
मुंबई

BMC : चर पुनर्भरणात कोट्यवधींची खैरात; खर्च ३३६ कोटींवरून ३९६ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई पालिकेने (BMC) रस्त्यांवरील चर बुजविण्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना (contractor) कोट्यवधी रुपयांची (crore rupees) खैरात वाटली आहे. प्रथम कोरोना प्रादुर्भाव (corona infection) आणि नंतर कमी दराने निविदा भरल्याने (tender) निविदा प्रक्रिया रद्द करून एकूण दहा महिन्यांची मुदतवाढ (date extension) दिली आहे. त्यामुळे पालिकेला मूळ कंत्राटकामात अतिरिक्त ६० कोटी रुपये मोजावे लागणार आहेत.

त्यामुळे याआधी २०१९-२०२१ पर्यंत असे २ वर्षांसाठी दिलेल्या ३३६ कोटी रुपयांच्या कंत्राटकामाची मुदत ३० जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निमित्त करून प्रथम ८ महिने आणि नंतर निविदा प्रक्रियेत ७ परिमंडळातील कामांसाठी ६३ कंत्राटदारांनी २७ ते ३६ टक्के कमी दर भरल्याचे निमित्त करून पुन्हा दोन महिने मुदतवाढ दिल्याने मूळ कंत्राट कामाच्या खर्चात आणखीन ६० कोटींची वाढ होऊन कंत्राटकामाचा खर्च हा ३९६ कोटी रुपयांवर जाणार आहे.

या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. सदर प्रस्तावात कंत्राटदारांवर मेहेरबानी करीत त्यांना तब्बल ६० कोटींचा वाढीव खर्च आणि मुदतवाढ देण्यात येत असल्याने त्यावर पालिकेतील पहारेकरी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्याकडून आक्षेप घेतला जाण्याची आणि त्यावर खरमरीत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुदतवाढीचा निर्णय

मुंबईत भूमिगत केबल जाळे, जलवाहिनी, नव्याने मलनिस्सारण वाहिनी टाकणे आणि दुरुस्तीकामांसाठी जुने आणि नवे रस्ते खणले जातात. त्यासाठी चर खोदण्यात येतात. हे चर बुजविण्याचे ३३६ कोटी रुपयांचे कंत्राटकाम दोन वर्षांसाठी कंत्राटदारांना परिमंडळनिहाय पालिकेने दिले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रथम एकदा मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र नंतर नवे कंत्राट देण्यासाठी निविदा मागविल्या. निविदेत कंत्राटदारांनी २७ ते ३६ टक्के कमी दर भरल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे निमित्त करून पुन्हा एकदा कंत्राटदारांना ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?

SCROLL FOR NEXT