मुंबई

कोरोना लसीकरणासाठी पुढील दोन महिने पालिकेसमोर आहे 'हे' मोठं आव्हान

समीर सुर्वे

मुंबई: मुंबई महानगर पालिकेला आता पुढील दोन महिन्यात 30 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण करायचा आहे. आजपासून 45 वर्षावरील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी महानगर पालिकेनं दोन शिफ्टमध्ये लसीकरण करण्याच्या सूचना सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत. त्यासाठी सरकारकडूनही अतिरिक्त लस मागविण्यात आल्या आहेत.

महानगर पालिकेनं आतापर्यंत 11 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. सध्या सार्वजनिक आणि खासगी असे मिळून 108 लसीकरण केंद्र कार्यरत असून त्यात दिवसाला 40 ते 45 हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. ही संख्या 1 लाखापर्यंत वाढविण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. त्यासाठी महानगर पालिकेने अतिरिक्त 27 रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरु करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागवली आहे. महानगर पालिकेला आतापर्यंतचे सर्व टप्पे 31 मे पर्यंत पूर्ण करायचे आहे, यात महानगर पालिकेपुढे मे महिन्या अखेरपर्यंत सुमारे 30 लाखांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचे आव्हान आहे. सध्या लसीकरण एका शिफ्टमध्ये सुरु होतं. जे आजपासून दोन शिफ्टमध्ये होत आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महानगर पालिकेने सकाळी 7 ते 2 आणि 2 ते 9 अशा दोन शिफ्टमध्ये लसीकरण सुरु करण्याची परवानगी रुग्णालयांना दिली आहे.  45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात आले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

सध्या महानगर पालिकेच्या परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्यालयात लसींचा साठा केला जात आहे. कांजूरमार्ग येथे मुख्य साठवणूक केंद्र तयार करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात हे केंद्र सुरु करण्याचा पालिकेचा विचार आहे. सध्या पालिकेकडे लसीचे दिड लाख डोस उपलब्ध असून आज सवा दोन लाख डोसचा साठा मिळणार आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

bmc wants complete vaccination phase more than 30 lakh citizens in next two months

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT