BMC-Chahal
BMC-Chahal 
मुंबई

BMC कोरोना चाचण्यांचा वेग वाढवणार, सध्या २० ते ३० हजार चाचण्या

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईतील रुग्णसंख्येत झालेली घट ही बाब जरी दिलासादायक असली तरी सध्या चाचण्या करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून दिवसाला फक्त 20 ते 30 हजाराच्या दरम्यान चाचण्या (bmc corona test) केल्या जात आहेत. मात्र, आता चाचण्यांचे प्रमाण पुन्हा वाढवणार असून कोरोना व्यक्तींच्या अतिसंपर्कातील आणि संशयित कोविड रुग्णांच्या (covid patient) चाचण्या करण्यावर पालिका प्रशासन भर देणार आहे. त्यामुळे, एका ही रुग्णाला न सोडण्याचा आणि कोणतीही उणीव न सोडण्याचे उद्दिष्ट्य पालिकेने आखले आहे. (Bmc will again increase corona testing speed)

फेब्रुवारी महिन्यात मुंबईची रूग्ण संख्या 11 हजारावर होती. सध्या मात्र कोरोना रूग्ण संख्या सातत्याने कमी होत आहे. मुंबईतील रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून चाचण्या करण्याची गती मंदावली असल्याचे समोर येत आहे. यावर  कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे पालिका म्हणत असली तरीही आता पुन्हा चाचण्या करण्याचा वेग वाढवून रूग्ण हेरण्यावर भर  देण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दुसर्‍या लाटेत सार्स कोविड -2

विषाणूचा प्रसार शहरभर झाला आहे.  पण, तो आटोक्यात राहावा यासाठी महापालिकेने फेब्रुवारीच्या मध्यापासून दररोज जवळपास 35,000 ते 45,000 चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. पण, सद्यस्थितीत फक्त 20 ते 30 हजारांच्या दरम्यान चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे, हा वेग वाढवून जास्तीत जास्त संशयित आणि अतिसंपर्कातील लोकांशी संपर्क करुन त्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

मुंबईत एका कोरोना व्यक्तीमागे 10 ते 12 लोकांचे संपर्क ट्रेस केले जात आहेत. आतापर्यंत पालिका फक्त 80 टक्केच नागरिकांचे संपर्क ट्रेस करु शकली आहे. त्यामुळे, जर चाचण्यांसह संपर्क ट्रेसिंग आणि संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढवल्या तर जास्तीत जास्त नागरिकांचा कोरोनापासून बचाव करता येईल.

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार, गेल्या 20 दिवसांत 5,24,348 व्यक्तींच्या चाचण्या झाल्या आहेत, म्हणजेच दररोज सरासरी 27,597 चाचण्या झाल्या. तर, एप्रिल महिन्यात दररोज सरासरी 50,000 चाचण्या केल्या जात होत्या. 

रुग्णसंख्येत घट म्हणून चाचण्यांमध्ये घट -

मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली असल्यामुळे दोन तीन दिवसांमध्ये चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले असून दरदिवशी 17000 चाचण्या झाल्या. पण, आता चाचण्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  कंटेनमेंट झोन, गर्दीची ठिकाणं इथे चाचण्या वाढवत आहोत. काल जवळपास 30 हजार चाचण्या झाल्या. अनलॉक काळात 50,000 चाचण्या प्रत्येक दिवशी केल्या जात होत्या. पण, आता 50,000 लक्ष्य नसून जे संशयित किंवा हाय रिस्क कॉन्टॅक्ट, किंवा गर्दीची ठिकाणे आहेत तिथे चाचण्या केल्या जातील.

डॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT