covid vaccine covid vaccine
मुंबई

लसीकरण पूर्ण झालेल्या इमारतींवर लागणार लोगो, मुंबई महापालिकेचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोना लसीचे दोन्ही (mumbai corona vaccination drive) डोस पूर्ण झालेल्या हाऊसिंग सोसायटी, इमारती, कार्यालयांसाठी मुंबई महापालिका लोगो तयार करणार आहे. या इमारतींच्या प्रवेशद्वारावर हे विशिष्ट लोगो लागणार आहेत. त्यामुळे संबंधित इमारतीमधून कोरोना प्रसाराचा धोका कमी असल्याचे इतरांना समजण्यास मदत होणार आहे.

सध्या राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यातच आता पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एक नवी संकल्पना राबविली आहे. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या हाऊसिंग सोसायट्या, इमारती, कार्यालयांसाठी मुंबई महापालिका लोगो तयार करणार आहे. मात्र, संबंधित इमारतीत राहणाऱ्या किंवा काम करणाऱ्या सर्वांचे लसीकरण झालेले असणे गरजेचे आहे. यामुळे इतरांनाही कोरोना लसीकरणासाठी प्रोत्साहन मिळेल, असं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आज फक्त ७३ केंद्रावरच लसीकरण -

मर्यादीत लससाठा उपलब्ध असल्याने आज 21 सप्टेंबर या दिवशी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 316 पैकी 73 निवडक महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण लसीकरण सुरु राहणार आहे. या 73 लसीकरण केंद्रांची यादी मुंबई महानगरपालिकेच्या समाजमाध्यमांवर प्रकाशित करण्यात आली आहे.

उद्यापासून सर्वच केंद्रावर लसीकरण मोहीम -

सोमवारी रात्री उशिरापर्यंत महानगरपालिका प्रशासनाला कोविड लससाठा उपलब्ध झाला असून या साठ्याचे वितरण आज मंगळवारी, 21 सप्टेंबर रोजी दिवसभरात विविध शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांना करण्यात येईल. बुधवारपासून सर्व 316 शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. मुंबईकर नागरिकांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT