मुंबई : रस्तेदुरुस्तीसाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर कामाच्या ऑडिटकरिता (Audit) सल्लागार नियुक्त करण्याचा कित्ता महापालिकेने (bmc) आश्रय योजनेतही गिरवला आहे. सहा महिन्यांपूर्वी आश्रय योजनेनंतर सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्वसनासाठी कंत्राटदार निश्चित झाल्यानंतर आता महापालिकेने प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती (Appointing Project advisor) करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. दोन प्रकल्पांवर सल्लागार नियुक्तीसाठी महापालिका सुमारे ६० कोटींहून अधिक खर्च करणार आहे.
जून २०२१ मध्ये महापालिकेने दक्षिण मुंबईतील पुनर्विकासाला मंजुरी दिलेल्या वसाहतींसाठी आता सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात पालिकेच्या डोंगरी, महम्मद अली मार्गासह फोर्ट परिसरातील वसाहतींचा समावेश आहे. या वसाहतींचा पुनर्विकास करताना त्या कामावर देखरेख ठेवणे, आराखड्यांना तसेच विविध मंजुऱ्या मिळवणे आदी कामांसाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जात आहे.
साधारण प्रकल्प खर्चाच्या पाच ते सहा टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यातील एका प्रकल्पाचा खर्च ६४७ कोटी आणि दुसऱ्या प्रकल्पाचा खर्च ४३७ कोटी आहे. या दोन्ही प्रकल्पांची मिळून एक हजार कोटीहून अधिक किंमत असल्याने सुमारे ६० कोटींहून अधिक रक्कम पालिका सल्लागारांवर खर्च करणार आहे.
सल्लागारांसाठी २५० कोटी
सफाई कामगारांच्या वसाहतींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प चार हजार २५१ कोटींचा असल्याचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. आगामी वर्षात त्यासाठी एक हजार ८०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काळात सर्वच वसाहतींसाठी सल्लागार नियुक्त केला जाणार असल्याने तब्बल २५० कोटी रुपयांच्या आसपास रक्कम सल्लागारावर महापालिका खर्च करणार आहे.
असे आहेत प्रकल्प
- फोर्ट परिसरातील राजवाडकर स्ट्रीट, पलटन रोड, वालपाखाडी येथे एक हजार १६ घरे तयार करण्याचा प्रकल्प आहे. त्यावर महापालिका ४३४ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.
- डोंगरी परिसरातील जेल रोड, डी प्रभागातील पी. जी. सोलंकी, भायखळा येथील सिध्दार्थ नगर, टँकपाखाडी या परिसरातील ६४७ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
सल्लागार काय काम करणार?
तपशीलवार आराखडा प्रमाणीकरण, पुरावे तपासणे, बांधकाम पर्यवेक्षण, सुरक्षा, गुणवत्तेवर देखरेख, बांधकामाला मंजुरी मिळण्यासाठी वास्तुकला सेवा पुरविणे आणि कामाचा दर्जा राखणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.