BMC sakal media
मुंबई

बोगदा खोदताना BMC चा अंदाज चुकला; टनेल बोअरिंग अडकल्याने कोट्यवधींचा फटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पवई ते घाटकोपरदरम्यान जलबोगदा (tunnel work) खोदताना टनेल बोअरिंग मशीन (Tunnel boring machine) अडकल्याने अडीच वर्षांपासून काम ठप्प आहे. अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला (BMC) १४७ कोटी ६८ लाख रुपयांचा खर्च कंत्राटदाराला द्यावा लागणार आहे, अशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या (sthayi samiti) पटलावर मांडली. तसेच पुढील कामासाठी नव्याने निविदा मागवण्यात येणार आहे.

महापालिकेने पवईपासून घाटकोपरपर्यंत ४.३६ किलोमीटर लांबीचा जलबोगदा खोदण्याचे काम २०१२ मध्ये सुरू केले. हे काम २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना भूगर्भातील प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेकदा कामामध्ये अडथळे आले. ऑगस्ट २०१९ मध्ये पवई येथील शिपिंग कार्पोरेशनजवळ खोदकाम सुरू असताना जमीन खचल्याने टनेल बोअरिंग मशीन जमिनीखालील चिखलात अडकले. तेव्हापासून हे मशीन तिथेच अडकून आहे. मशीन अडकल्याने तोपर्यंत झालेले काम आणि झालेल्या नुकसानीपोटी पटेल इंजिनिअरिंग कंपनीने १६७ कोटी रुपयांचा दावा केला होता.

या दाव्याच्या बदल्यात पालिका संबंधित कंत्राटदाराला १४७ कोटी ६८ लाख रुपये देणार आहे. तसेच नवा कंत्राटदार नियुक्त होईपर्यंत कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारीही संबंधित कंत्राटदाराची असणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, प्रशासनाने आता पुढील काम करण्यासाठी नवा कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र पुढील कामांसाठी पुन्हा कोट्यवधीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.

प्रकल्पाबाबत थोडक्यात

- पवईपासून घाटकोपरपर्यंत ४.३६ किलोमीटरच्या लांबीसाठी २२३ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित
- आतापर्यंत १.२० किलोमीटरचे काम झाले असून कंत्राटदाराला १४७ कोटी ६८ लाख रुपये द्यावे लागणार
- मशीन अडकली त्या ठिकाणी भूगर्भाचा स्तर ज्वालामुखीच्या राखेपासून बनलेला
- अशा प्रकारची कामे करण्यापूर्वी जमिनीचा स्तर तपासून त्यानुसार आराखडा तयार केला जातो; मात्र याबाबत पालिकेचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT