मुंबई : फोर्ट येथे मार्च 2019 कोसळलेल्या हिमालय पुलाच्या पुनर्बाधणीसाठी महापालिकेने निवीदा मागवल्या आहे. या पुलाच्या बांधणीसाठी 6 कोटी 38 लाखांचा खर्च अंदाजित आहे. समुद्राच्या खाऱ्या हवेमुळे लोखंडी पुल खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन नवा पुल पोलादााचा (स्टिल) बनविण्यात येणार आहे.
हिमालय पुल 14 मार्च 2019 ला संध्याकाळी कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता.तर,30 जण जखमी झाले होते.या दुर्घटनेच्या चौकशी समितीने पुलावर करण्यात आलेल्या कॉंक्रीटच्या कामामुळे वाढलेला भार तसेच पुलाचे अॅंगल गंजल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली होती.तब्बल दिड वर्षा पेक्षा अधिक काळानंतर महापालिकेने या कामासाठी निवीदा मागवल्या आहेत.नव्या पुलावर पोलाचाचे गर्डर टाकण्यात येणार आहेत.
महापालिका मुख्यालय,कामा रुग्णालय,अंजूमन इस्लाम महाविद्याल,झेव्हिअर्स महाविद्यालय येथील कर्मचारी आणि विद्यार्थी प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी या पुलाचा वापर करत होते.मात्र,आता पुल नसल्याने डी.एन मार्ग पायी ओलांडावा लागतो. त्यात वाहतुक कोंडी होते.या पुलाचे बांधकाम करताना पादचारी आणि वाहानांना अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार आहे
BMCs tender for reconstruction of Himalayan bridge The new pool will be made of steel
-----------------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.