Reliance  sakal
मुंबई

‘रिलायन्स कॅपिटल’चे संचालक मंडळ बरखास्त

थकीत देणी तसेच व्यवस्थापनाबाबतच्या चिंतांमुळे रिझर्व्ह बँकेने आज रिलायन्स कॅपिटल या अनिल अंबानींच्या वित्तसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : थकीत देणी तसेच व्यवस्थापनाबाबतच्या चिंतांमुळे रिझर्व्ह बँकेने आज रिलायन्स कॅपिटल या अनिल अंबानींच्या वित्तसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले. अनेक देणी थकविल्याच्या प्रमुख मुद्यावरून ही कारवाई झाली आहे.

कंपनीवर लवकरच दिवाळखोरीसंदर्भातही कारवाई केली जाईल. रिझर्व्ह बँकेने कंपनीवर तूर्त प्रशासक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र चे माजी कार्यकारी संचालक नागेश्वर राव यांची नियुक्ती केली आहे.

लवकरच इन्सॉलव्हन्सी अँड बँकरप्सी रूल्स नुसार कंपनीवर कारवाई करण्याचेही सूतोवाच रिझर्व्ह बँकेने केले आहे. देणी थकविण्याबरोबरच कंपनीच्या व्यवस्थापनासंदर्भातील काही मुद्द्यांची सोडवणूक संचालक मंडळ करू शकले नाही, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात प्रशासक नेमण्यासाठी लवकरच रिझर्व्ह बँक नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडेही अर्ज करणार आहे. न्यायालयाने कंपनीच्या मालमत्तांची विक्री करण्यास मनाई केल्याने आपल्याला पैसे जमवणे कठीण झाले व त्यामुळे कर्जे थकली, असे कंपनीने मागीलवर्षी शेअर बाजारांना कळवले आहे.

एचडीएफसी व अॅक्सिस बँक यांच्याकडून घेतलेल्या कर्जावरील ६२४ कोटी रुपयांच्या कर्जावरील व्याज थकविल्याचे रिलायन्स कॅपिटलने कळवले होते. एचडीएफसी चे थकलेले व्याज चार कोटी ७७ लाख तर अॅक्सिस बँकेचे व्याज ७१ लाख रु. होते. सव्वाआठ ते साडेदहा टक्के व्याजदराची ही कर्जे होती व त्यांची मुदत सहा महिने ते सात वर्षे एवढी होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT