मुंबई

ठाण्यात आढळले लंगूर माकडांचे गाडलेले दोन मृतदेह; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये होऊ शकतो महत्त्वाचा खुलासा

सुमित बागुल

ठाणे  : ठाण्यामध्ये दोन लंगूर प्रजातीच्या माकडांचे मृतदेह गाडलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. सदर घटना ठाणे शहरातील वागळे इस्टेट या गजबजलेल्या भागात उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. या माकडांवर प्राणघातक हल्ला झाल्याचा संशय वन अधिकाऱ्यांना आहे. ठाण्यातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षात (आरडीएमसी) मध्ये दोन माकडांना विजेचा शॉक लागल्याचा फोन आलेला.

याबाबत बोलताना ठाण्यातील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील अधिकारी संतोष कदम म्हणालेत की, “आम्ही या माकडांना वाचवण्यासाठी तातडीने घटनास्थळी पोहोचलो, पण तेंव्हा त्यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. सोबतच त्यांचे मृतदेह तिसऱ्याच व्यक्तीने पुरल्याचेही आम्हाला घटनास्थळावरून समजलं, त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून सदर मृतदेह बाहेर काढण्यात आलेत." 

वन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोन माकडांपैकी एक माकड हे तीन ते चार वर्षीय नर तर दुसरं एक वर्षीय मादी प्रजातीचे होते. 

या दोनही माकडांचे मृतदेह गाडलेल्या अवस्थेत आढळल्याने आता याबाबत वन अधिकाऱ्यांकडून अधिक तपास केला जाणार आहे. या घटनेत खरंच माकडांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला की मारहाणीमुळे या माकडांना आपले प्राण गमवावे लागले, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यानंतर या माकडांचे मृतदेह संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचं रेंज फॉरेस्ट ऑफिसर नरेंद्र मुथे म्हणालेत. 

bodies of langur monkeys found buried after allegedly being electrocuted at Wagle Estate Thane

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

Latest Maharashtra News Updates : ..मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत? - संजय राऊतांचा सवाल!

Farmer Situation : औसा तालुक्यातील शिवणी (बु.) येथील वृद्ध शेतकरी दांपत्य ओढताहेत हाताने कोळपे

टीआरपीमध्ये अचानक वर आली 'ही' मालिका; 'या' मालिकांना टाकलं मागे; अभिनेत्याने केली खास पोस्ट

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

SCROLL FOR NEXT