मुंबई

दीड महिन्यापासून बेपत्ता मुलाचा मृतदेह आढळला पाण्याच्या टाकीत; भिवंडीतील धक्कादायक घटना

शरद भसाळे

भिवंडी : दीड महिन्यापासून भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका सातवर्षीय मुलाचा मृतदेह शहरातील भोईवाडा भागातील समरुबाग कम्पाऊंडच्या एका इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळून आला आहे. गुरुवारी (ता. 7) उशिरा हा प्रकार उघड झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.भोईवाडा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे. 

आहत (7) असे मृत मुलाचे नाव असून तो 25 नोव्हेंबरला बेपत्ता झाला होता. या प्रकरणी भोईवाडा पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी शोध सुरू केला होता. दरम्यान, या परिसरात गुरुवारी सायंकाळी उशिरा परिसरातील काही मुले या ठिकाणी क्रिकेट खेळत होती, त्या वेळी चेंडू पाण्याच्या टाकीत पडला असता, ही घटना उघड झाली आहे. पोलिसांनी मृतदेहाचा सांगाडा बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक शंकर इंदलकर पुढील तपास करीत आहेत. 

The body of a boy who had been missing for a month and a half was found in a water tank Shocking incident in Bhiwandi

------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

Arvind Kejriwal: 'मोदी सरकारचा अंत पंजाबमधून होईल’; अरविंद केजरीवाल यांची दावा, भाजपवर जोरदार निशाणा!

SCROLL FOR NEXT