Raigad body building sakal media
मुंबई

रायगड : कोप्रोलीचा अनिल म्हात्रे जिल्हास्तरिय गुरूकुल श्री 2022 चा मानकरी

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : येथील गुरुकुल व्यायामशाळेतर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गुरुकुल श्री २०२२ (Gurukul Shree 2022) स्पर्धेत उरण तालुक्यातील कोप्रोली येथील रायगड हेल्थ सेंटरचा (Raigad Health center) अनिल म्हात्रे (Anil Mhatre) मानकरी ठरला. स्पर्धेमध्ये बेस्ट पोझरचा बहुमान रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली येथील जितेंद्र पाटील (Jitendra Patil) याने पटकावला.

कुरूळ येथे रायगड जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्‌घाटन आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे दक्षिण विभागाचे जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, नागावचे सरपंच निखिल मयेकर, दीपक रानवडे, डॉ. राजेंद्र चांदोरकर, सौरभ मोकल, सुशील पाटील, सुनील राणे आणि अमिर ठाकूर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये बेस्ट पोझर रायगड हेल्थ सेंटर कोप्रोली येथील जितेंद्र पाटील; तर बेस्ट बॉडी मसल म्हणून गुरुकुल व्यायामशाळेच्या प्रसाद सुतार यांची निवड करण्यात आली. ही स्पर्धा चार गटांत घेण्यात आली.

पहिल्या गटात मयेकर जिम कुरूळच्या ऋषिकेश म्हात्रे याने प्रथम क्रमांक मिळविला. दुसऱ्या गटात कोप्रोलीच्या रायगड हेल्मा सेंटरमधील अजित म्हात्रे, तिसऱ्या गटात पायरी बेस्ट अलिबागच्या विशाल बानकर आणि चौथा गटात गुरुकुल व्यायामशाळेचा प्रसाद सुबार हा अव्वल ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT