tharapur  
मुंबई

धक्कादायक! तारापूर वसाहतीत आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

संदीप पंडित

विरार : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गंगोत्री हॉटेल समोरच्या मोकळ्या मैदानालगतच्या झाडीत चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने बोईसर परिसरात खळबळ उडाली आहे. शिवरत्न रॉय (शिवम) (वय-18) असे मयत युवकाचे नाव आहे. नुकताच तो इयत्ता 10 वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता.

शनिवार (ता. 22) रात्री 9 वाजताच्या सुमारास अवध नगरमधील रोशन गॅरेज गल्लीतील राहत्या घरात तो मोबाईलमध्ये गेम खेळत होता. दरम्यान, मित्राने बाहेर बोलावल्यानंतर शिवम मोबाईल घरी ठेवून घराबाहेर गेला होता. तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये मंगळवारी उशिरा हरवल्याची दाखल करण्यात आली होती.

बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गंगोत्री हॉटेल समोरच्या मोकळ्या मैदानालगतच्या झाडीत शिवमचा मृतदेह आढळून आला. बोईसरचे उप विभागीय पोलिस अधिकारी विश्‍वास वळवी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

body of a missing young boy was found in Tarapur colony

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT